मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावरुन महेला जयवर्धने यांची हकालपट्टी होण्याची शक्यता

IPL 2022
भरत जाधव
Updated May 04, 2022 | 11:01 IST

इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) सर्वात यशस्वी संघ जर कोणता असेल तर तो म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मानली जाते. आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात केवळ एकच विजय नोंदवता आला आहे. मुंबईच्या या अशा कामगिरीमुळे आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये त्यांच्या चाहत्यांची खूप निराशा झाली आहे.

Mahela Jayawardene likely to be sacked as Mumbai Indians head coach
महेला जयवर्धनेची मुंबई इंडियन्स प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी?  |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) सर्वात यशस्वी संघ जर कोणता असेल तर तो म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मानली जाते. आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात केवळ एकच विजय नोंदवता आला आहे. मुंबईच्या या अशा कामगिरीमुळे आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये त्यांच्या चाहत्यांची खूप निराशा झाली आहे. मुंबईच्या संघाची ही स्थिती पाहता संघात मोठे बदल होण्याची शक्यता असून याची सुरुवात प्रशिक्षकांपासून होणार आहे. महेला जयवर्धने यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्याच्या सिझनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम तळाला आहे. IPL 2022 मध्ये मुंबईने पहिले 8 सामने गमावले आहेत. 9वा सामना जिंकल्यानंतरही मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची कोणतीही संधी नाहीये. दरम्यान याचा ठपका खेळाडूंबरोबरच कोचिंग स्टाफच्याही माथी मारला जात आहे. कदाचित याचा परिणाम पुढच्या सिझनमध्ये पहायला मिळू शकतो. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने हे सध्या टार्गेटवर असल्याचं म्हटलं जातं आहे. महेला जयवर्धने मुख्य प्रशिक्षक बनताच टीमने 2017 मध्ये विजेतेपद पटकावलं. यानंतर, 2018 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. मात्र पुढच्या दोन्ही सिझनमध्ये म्हणजे 2019 आणि 2020 मध्ये सलग जेतेपदं पटकावून टीमने चांगलं कमबॅक केलं.

मात्र सध्याच्या सिझनची मुंबईची कामगिरी फारच वाईट दिसून आली. IPL 2022 चा मुंबईचा परफॉरमन्स पाहता, फ्रेंचायझी पुढच्या वर्षी मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना बदलण्याचा विचार करू शकते. त्यामुळे आयापीएलच्या आगामी सिझनमध्ये मुंबईच्या टीममध्ये प्रशिक्षकपदासाठी मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी