RR vs RCB, Qualifier 2: आज टॉस ठरवणार फायनलचे तिकीट? पाहा काय सांगते दोन्ही संघाची आकडेवारी

IPL 2022
Updated May 27, 2022 | 09:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

RR vs RCB, Qualifier 2 । आयपीएलचा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. आयपीएल २०२२ च्या साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुण्यातील तीन स्टेडियमवर खेळले गेले आणि या सर्व सामन्यांमध्ये नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका बजावली.

Match between RCB and Rajasthan Royals will be played in IPL Qualifier 2 today
आज RR की RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट? पाहा आकडेवारी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे.
  • आज RR की RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट?
  • क्वालिफायर २ मध्ये राजस्थान आणि बंगळुरू आमनेसामने असतील.

RR vs RCB, Qualifier 2 । मुंबई : आयपीएलचा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. आयपीएल २०२२ च्या साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुण्यातील तीन स्टेडियमवर खेळले गेले आणि या सर्व सामन्यांमध्ये नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका बजावली. बहुतांश सामन्यांमध्ये कर्णधारांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रत्येक वेळी संघांना विजय मिळाला नसला तरी दव पडल्यामुळे प्रथम गोलंदाजी घेण्याचा ट्रेंड बनला होता. अशा परिस्थितीत बीसीसीआयने (BCCI) खेळाडू आणि चाहत्यांमध्ये अंतिम सामन्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी प्लेऑफ फेरीचे सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. (Match between RCB and Rajasthan Royals will be played in IPL Qualifier 2 today). 

अधिक वाचा : Environment Day 2022: या पर्यावरण दिनी करा हे ५ संकल्प, पृथ्वी होऊ शकते स्वर्ग 

कोलकाताच्या 'ईडन गार्डन'मध्ये राहिली बरोबरी

कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांचे निकाल संमिश्र राहिले होते. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातने आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा पराभव केला. तर एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्सला आव्हान पूर्ण करू दिले नाही आणि १४ धावांच्या फरकाने विजय नोंदवून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याच्या निर्णयाकडे कल

दरम्यान, आजचा क्लालिफायर २ हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अशा परिस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मैदानावर देखील दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ मजबूत स्थितीत राहिला आहे. त्यामुळे साहजिकच आजच्या सामन्यात देखील कर्णधार नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. लक्षणीय बाब म्हणजे या मैदानावर टी-२० मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने फक्त ६ सामने जिंकले आहेत, तर आव्हानाचा पाठलाग करताना ११ सामने जिंकले आहेत. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल अशी शक्यता आहे. 

टॉसच्या बाबतीत सॅमसन अनलकी

आयपीएल २०२२ मध्ये संजू सॅमसनने खूप कमी वेळा टॉस जिंकला आहे. पहिल्या क्वालिफायरपर्यंत खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी संजूने १३ वेळा टॉस हरला आहे. मात्र अशा स्थितीत विरोधी संघाचे निर्णय चुकीचे सिद्ध करत राजस्थानने साखळी फेरीत दुसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे टॉस राजस्थानच्या संघावर जास्त प्रभाव टाकणार नाही. कारण संघ व्यवस्थापन आणि कर्णधार दोघांनाही प्रथम फलंदाजी करण्याची सवय झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी