आयपीएलच्या सर्व सामन्यांना स्थगिती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

IPL 2021
Updated May 04, 2021 | 15:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

तीन वेगळ्या संघातील चार खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.

ipl
आयपीएलच्या सर्व सामन्यांना स्थगिती, सोशल मीडियावर मीम्स 

थोडं पण कामाचं

  • गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे चार खेळाडू बाधित झाले आहेत.
  • आयपीएलच्या सर्व सामन्यांना स्थगिती दिली आहे
  • लोकांनी या निर्णयावर विविध प्रकारचे मीम्स बनवले आहेत.

मुंबई: देशात कोरोनामुळे(corona) स्थिती खूपच बिकट बनली आहे. आता आयपीएल(ipl 2021) प्रशासनानेही कोरोनामुळे स्थिती गंभीर झालेली असताना आयपीएलच्या सर्व सामन्यांना स्थगिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे चार खेळाडू बाधित झाले आहेत. त्यामुळे सध्या ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की या सत्रासाठी सामने स्थगित करण्यात आले आहेत. ही बातमी येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीम्सचा पाऊस पडतोय. लोकांनी या निर्णयावर विविध प्रकारचे मीम्स बनवले आहेत.

आयपीएलच्या ३ वेगवेगळ्या फ्रंचायझींचे एकूण मिळून ४ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२१मध्ये तात्पुरती स्थगिती देण्याचे बीसीसआयने ठरवल्याची माहिती बीसीसाय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. रिपोर्टनुसार अमित मिश्राही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याआधी कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर वृद्धिमन साहालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी