MI v KKR : मुंबईसाठी अर्जुन ठरला लकी; जिगरबाज केकेआरवर दणदणीत विजय

IPL 2023
भरत जाधव
Updated Apr 16, 2023 | 19:58 IST

अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय साकारला. वेंकटेश अय्यरच्या शतकाच्या जोरावर केकेआरने 185 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने धडाकेबाज फलंदाजी केली आणि  आपला या हंगामातील दुसरा विजय नोंदवला.

MI v KKR : Arjun gets lucky for Mumbai; A resounding win over Jigarbaz KKR
मुंबईसाठी अर्जुन ठरला लकी; जिगरबाज केकेआरवर दणदणीत विजय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या संघाने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चक्क रोहित शर्माला उतरवले होते.
  • इशानने यावेळी फक्त 25 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 58 धावांची खेळी साकारली.
  • तिलक वर्मानेही यावेळी 30 धावांची खेळी साकारली.

मुंबई : अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय साकारला. वेंकटेश अय्यरच्या शतकाच्या जोरावर केकेआरने 185 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने धडाकेबाज फलंदाजी केली आणि  आपला या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. (MI v KKR : Arjun gets lucky for Mumbai; A resounding win over Jigarbaz KKR)

अधिक वाचा  : Zigana Pistol 18 सेकेंदात फायर करते 20 गोळ्या

केकेआरच्या 186 धावांचा पाठलाग करायला मुंबईचा संघ उतरला आणि सर्वांनाच धक्का बसला. कारण मुंबईच्या संघाने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चक्क रोहित शर्माला उतरवले होते. रोहित आणि इशान यांनी यावेळी चांगली सुरुवात केली. पण रोहितला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने 13 षटकांत 20 धावा केल्या. पण रोहित बाद झाला तरी इशान किशनने यावेळी जोरदार फटकेबाजी केली. इशानने यावेळी फक्त 25 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 58 धावांची खेळी साकारली.

अधिक वाचा  : तरुणावर 10 ते 12 मोकाट कुत्र्यांचा हल्ला, युवकाचा मृत्यू

पण त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादात इशान बाद झाला. त्यानंतर मुंबईचा हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सूर्याने यावेळी धडाकेबाज खेळी साकारत मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. पण सूर्याने यावेळी थोडी घाई केली आणि त्यामुळेच तो बाद झाला. सूर्या आता मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल असे वाटत होते. पण शार्दुल ठाकूरने सूर्याला बाद केले, सूर्याने यावेळी 25 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 43 धावा केल्या. तिलक वर्मानेही यावेळी 30 धावांची खेळी साकारली. टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन यांनी संघाला विजय मिळवून दिला. 

कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना  6 गडीच्या मोबदल्यात 185 धावा केल्या. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने दमदार फलंदाजी करत आपले शतक झळकावले आहे. तर मुंबईकडून गोलांजांनी कमाल क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करत कोलकाताच्या धावांना आळा घातला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी