मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्स, आयपीएल २०२०चे Dream11चा अंदाज

IPL 2020
Updated Sep 19, 2020 | 13:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

गतविजेते मुंबई इंडियन्स आज चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान स्वीकारणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२०चा हा पहिलाच सामना असणार आहे. हा आहे आमचा या सामन्याचा Dream11चा अंदाज.

Mumbai Indians Vs. Chennai Super Kings
मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सूपरकिंग्स, आयपीएल २०२०चे Dream11चा अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • काय आहेत दोन्ही संघांच्या जमेच्या आणि तोट्याच्या बाजू?
  • Dream11चा मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सूपरकिंग्स संघांचा अंदाज
  • मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सूपरकिंग्सचे संपूर्ण संघ

गतविजेते (Defending champions) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आज म्हणजेच शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सचे (Chennai Super Kings) आव्हान स्वीकारणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२०चा (IPL 2020) हा पहिलाच सामना अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियममध्ये (Sheikh Zayed Stadium) होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७:३० (7:30 PM IST) वाजता सुरू होणार आहे.

हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी ठरलेले दोन संघ आहेत. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स हा संघ महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सच्या विरुद्ध १७-११ अशा फायद्याच्या स्थानी आहे.

काय आहेत दोन्ही संघांच्या जमेच्या आणि तोट्याच्या बाजू?

यंदा मुंबईच्या संघाला आयपीएलमधील सर्वात अधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगाची साथ मिळणार नसली तरी दुसऱ्या बाजूला महेंद्रसिंह धोनीकडेही त्याचा चांगला सहकारी आणि आयपीएलचा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक धावा काढणारा सुरेश रैना नसणार आहे. हरभजन सिंगही आयपीएल २०२०मध्ये दिसणार नाही.

मुंबईच्या ताकदवान मधल्या फळीच्या फलंदाजांमध्ये काही महत्वाची नावे आहेत. हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू हे या फळीचा प्राण आहेत. आपल्या अष्टपैलू शैलीने ते मुंबईच्या संघात समतोल आणतात. अनुभवी कीरन पोलार्ड हाही नुकत्याच संपलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये फारच फॉर्मात दिसून आला होता.

तर चेन्नई सुपरकिंग्सचा संपूर्ण संघ महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना बघण्यासाठी उत्सुक आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

चेन्नईचा रिस्ट स्पिनर इमरान ताहिर हा पुन्हा एकदा हुकमाच्या एक्क्याची आपली भूमिका पार पाडायला सज्ज आहे. ४१ वर्षाच्या या खेळाडूने कधीही संघाची निराशा केलेली नाही आणि गेल्या वर्षी तर तो पर्पल कॅपचा मानकरीही ठरला होता. सीएसकेचा आणखी एक अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू शेन वॉटसनही या मालिकेची सुरुवात आपल्या सलामीने करण्यासाठी सज्ज आहे.

भारताचे जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, एमएस धोनी, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, केदार जाधव असे खेळाडू या दोन संघांमध्ये विभागलेले आहेत आणि यांनी एकमेकांशी दिलेली लढत प्रेक्षकांसाठी नक्कीच रोमांचकारक ठरणार आहे.

यंदाचे सर्व सामने हे बो-बबलमध्ये होणार असून स्टेडियम्समध्ये एकही प्रेक्षक असणार नाही.

Dream11चा मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्स संघांचा अंदाज

हार्दिक पांड्या (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), एमएस धोनी, अंबाती रायुडू, फाफ डुप्लेसिस, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, दीपक चहर, इमरान ताहीर, जसप्रीत बुमराह.

दोन्ही बाजूंचे संभाव्य ११ खेळाडू

मुंबई इंडियन्स- क्विंटन डे कॉक (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पांड्या, कीरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नेथन कोल्टर-नाईल.

चेन्नई सुपरकिंग्स- शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अंबाती रायुडू, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, पियुष चावला, दीपक चहर, शार्दूल ठाकुर आणि इमरान ताहिर.

संपूर्ण संघ

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), डे कॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कीरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, नेथन कोल्टर-नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, जेम्स पॅटिसन, आदित्य तारे, मिशेल मॅकलेघन, क्रिस लिन, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, मोहसीन खान, शरफेन रुदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बळवंत राय.

चेन्नई सुपरकिंग्स- शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डुप्लेसिस, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, पियुष चावला, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, इमरान ताहिर, मुरली विजय, कर्ण शर्मा, जोश हेझलवुड, लंगी एनगिडी, मोनू कुमार, मिशेल सँटनर, सॅम कुरान, रविकिशन साई किशोर, एन. जगदीशन, ऋतुराज गायकवाड, के. एम. आसिफ.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी