IPL 2019: बुमराहच्या 'या' चेंडूमुळे घडली असती मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावला 'हा' खेळाडू- पाहा VIDEO

IPL 2019
Updated Apr 16, 2019 | 09:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jasprit Bumrah, AB de Villiers, IPL 2019, MI vs RCB: आयपीएल २०१९ मधील सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात बुमराहच्या एका चेंडूवर एबी डिव्हिलियर्स अगदी थोडक्यात बचावला. पाहा हा व्हिडिओ.

Bumrah_AB_AP
बुमराहच्या 'या' चेंडूमुळे घडली असती मोठी दुर्घटना  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल (सोमवार) झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. हार्दिक पांड्याच्या तुफानी फटकेबाजीमुळे मुंबईने हा सामना ५ विकेट राखून जिंकला. दरम्यान, या सामन्यात एक क्षण असा आला की, ज्याने सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवला. तो म्हणजे जसप्रीत बुमराहने टाकलेला एक घातक चेंडू 

या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं. सुरूवातीलाच कर्णधार विराट कोहली बाद झाल्याने संघाची धुरा एबी डिव्हिलियर्सच्या खांद्यावर आली होती. यावेळी डिव्हिलियर्सने देखील ४१ चेंडूत अर्धशतक झळकावलं. याच वेळी १९ व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एक वेगवान बाउंसर टाकला. या चेंडूवर एक जोरदार फटका मारण्यासाठी डिव्हिलियर्स डावा बाजूला वळला. पण त्याचवेळी चेंडू अतिशय वेगाने त्याच्या हेल्मेटच्या अगदी मागच्या बाजूला लागला. हा चेंडू एवढ्या जोरात लागला की त्याचा आवाज अगदी प्रेक्षक गॅलरीपर्यंत ऐकू आला. यामुळे अक्षरश: प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यावेळी सगळेच खेळाडू डिव्हिलियर्सच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याची विचारपूस केली. कारण की, डिव्हिलियर्सने जे हेल्मेट घातलं होतं. त्याच्या मागील बाजूस दोन गार्ड बसवण्यात आलेले नव्हते. पाच वर्षापूवी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ह्यूजच्या अपघाती निधनानंतर हेल्मेटच्या मागे गार्ड बसवले जाऊ लागले आहेत. ज्यामुळे मानेजवळील भागाला संरक्षण मिळतं. 

पाहा व्हिडिओ: 

या चेंडूनंतर कर्णधार रोहित शर्मा तात्काळ डिव्हिलियर्सकडे धावत गेला आणि त्याची विचारपूस केली. त्यावेळी रोहितने त्याला सांगितलं देखील की, तुझ्या हेल्मेटच्या मागच्या बाजूला गार्ड नाहीत. पण सुदैवाने बुमराहने टाकलेला चेंडू हेल्मेटच्या अगदी खालच्या बाजूला बसला होता. त्यामुळे डिव्हिलियर्सला कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान, टीम मॅनेजमेंट याबाबत डिव्हिलियर्सला नक्कीच योग्य तो सल्ला देईल. त्यामुळे यापुढे डिव्हिलियर्स संपूर्ण गार्ड असलेलं हेल्मेट घातलेला पाहायला मिळू शकतो.  

दुसरीकडे या सामन्यात, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यावेळी प्रथम फलंदाजी करताना एबी डिव्हिलियर्सने ७५ धावांची शानदार खेळी केली. ज्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सने २० षटकात १७१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या क्विंटन डी कॉक (४०) आणि हार्दिक पांड्या (३७ नाबाद) यांच्या खेळीच्या जोरावा १९ षटकातच हे आव्हान पार केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: बुमराहच्या 'या' चेंडूमुळे घडली असती मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावला 'हा' खेळाडू- पाहा VIDEO Description: Jasprit Bumrah, AB de Villiers, IPL 2019, MI vs RCB: आयपीएल २०१९ मधील सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात बुमराहच्या एका चेंडूवर एबी डिव्हिलियर्स अगदी थोडक्यात बचावला. पाहा हा व्हिडिओ.
Loading...
Loading...
Loading...