मुंबई: पंजाब किंग्स (Punjab Kings)आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शानदार पुनरागमन करताना गुजरात टायटन्स (Gujarat Titans)चा विजयरथ रोखला. पंजाब किंग्सने गुजरातला धमाकेदार अंदाजात ८ विकेटनी हरवले. या सामन्यात गुजरात टायटन्ससाठी एका खेळाडूने खराब कामगिरी केली. हा खेळाडू केवळ १ ओव्हरमध्ये गुजरात टायटन्ससाठी व्हिलन बनला. mohammad shami flop against punjab kings in ipl 2022
अधिक वाचा - देशाच्या प्रधानावर आर्थिक संकट येणार, भेंडवळची भविष्यवा
गुजरात टायटन्सच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(Mohammed Shami) पंजाबविरुद्धच्या सामन्यात सपशेल फेल ठरला. शमने आपल्या पहिल्या ३ ओव्हरमध्ये १५ धावा देत एक विकेट मिळवली. यानंतर गुजरात टायटन्ससाठी त्याने १६वी ओव्हर खेळली. या एका ओव्हरमध्ये तरी तो चांगली गोलंदाजी करेल असे वाटले होते मात्र त्याच्या उलट घडले. त्याने आपल्या या ओव्हरमध्ये चक्क २८ धावा दिल्या. पंजाब किंग्सचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने या ओव्हरमध्ये शमीला तीन सिक्स आणि दोन फोर ठोकले. या ओव्हरनंतर गुजरातचा पराभवाचा सामना करावा लागला.
कॅगिसो रबाडाची घातक गोलंदाजी आणि शिखर धवनची शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने हा सामना जिंकला. शिखर धवनने सामन्यात ६२ धावांची खेळी केली. तर लियाम लिव्हिंगस्टोनने १० बॉलमध्ये धुवांधार ३० धावा केल्या. तर भानुका राजपक्षेने २८ बॉलमध्ये ४० धावा केल्या. पंजाबच्या गोलंदाजांनीही शानदार खेळ केला. कॅगिसो रबाडाने सामन्यात चार विकेट मिळवल्या. तर ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीप सिंह यांनी १-१ विकेट मिळवला.
अधिक वाचा - राज ठाकरेंनी मानले मौलवींचे आभार
गुजरात टायटन्सचा संघ आयपीएल २०२२मध्ये चांगला खेळ करत आहे. संघाने आतापर्यंतच्या १० सामन्यांपैकी ८ सामने जिंकलेत. कर्णधार हार्दिक पांड्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय.