IPL 2023: क्रिकेटच्या मैदानावर आऊट न होता टिकून राहणं, खेळणं आणि संघाला विजय मिळवून देणं यासाठी प्रत्येक खेळाडूचे प्रयत्न असतात. पण तरीही खेळाडू आऊट होतात. नजर हटी दुर्घटना घटी हा नियम क्रिकेटमध्येही लागू होतो. त्यामुळे आऊट होणं ही फारशी सन्मानजनक गोष्ट नाही. यातही रन आऊट म्हणजेच धावबाद होणं ही तर आजिबातच सामान्य गोष्ट नाही. तुमचा फिटनेस, चपळता अशा बऱ्याच गोष्टींचा यावेळी कसं लागत असतो. मात्र तरीही अनेक खेळाडू धावबाद होतात. यापैकीच काही खेळाडूंबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. (Most run out batsman in test and odi)
या नावाची कदाचित तुम्हाला पहिल्या क्रमांकावर अपेक्षा असणार आहे. तर होय, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक 322 डावांत 38 वेळा धावबाद झाला आहे.
अधिक वाचा: IPL 2022 Final: ऐकलं का! तब्बल एवढ्या लोकांनी IPL ची फायनल थेट मैदानातून पाहिली
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि कधीकाळी जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी असलेला एक वसीम अक्रम या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. 280 डावात तो 28 वेळा धावबाद झाला आहे.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 208 डावात 32 वेळा धावबाद झाला. तो तिसऱ्या क्रमांकावर येतो.
ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ पाचव्या क्रमांकावर आहे. तो 236 डावांत 32 वेळा धावबाद झाला होता.
श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा 255 डावांत 30 वेळा या धावबाद झाला होता. तो सहाव्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानचा मोहम्मद युसूफ 191 डावात 30 वेळा धावबाद झाला होता. तो सातव्या क्रमांकावर आहे.
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचेही नाव या नको असलेल्या यादीत आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक 249 डावात 29 वेळा धावबाद झाले आहेत.
अधिक वाचा: VIDEO: हार्दिक पांड्याने विकेट घेतल्यानंतर पार केल्या सर्व मर्यादा
अॅलन बॉर्डर हे या यादीत अनुक्रमे 8 व्या क्रमांकावर आहेत. अॅलन बॉर्डर 28 वेळा धावबाद झाला आहे.
श्रीलंकेचे हे दोन्ही खेळाडू 9 व्या आणि 10 व्या क्रमांकावर येतात. अरविंद डी सिल्वा 27 वेळा धावबाद झाला आहे. तर मारवान अटापट्टूचे 230 डावात 27 वेळा धावबाद झाला आहे.