मुंबई: चेन्नई सुपर किंग्ससाठी(chennai super kings) आयपीएल २०२२ची(ipl 2022) सुरूवात खूपच भयानक झाली आहे. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने(kolkata knight riders) मात दिली. या हंगामाच्या सुरूवातीला महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सोडले होते त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले आहे. रवींद्र जडेजा अद्याप धोनीसारखी जादू करू शकलेला नाही. MS Dhoni decision became wrong in match against lucknow supergiants
अधिक वाचा - श्रीलेंकत राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळची निदर्शने झाली हिंस
लखनऊ सुपरजायंट्सने गुरूवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ६ विकेटनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि कर्णधार रवींद्र जडेजाचा एक निर्णय चुकीचा ठरला. या कारणामुळे युवा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवासाठी जबाबदार ठरला आहे. खरंतर, लखनऊ सुपरजायंटला शेवटच्या १२ बॉलमध्ये ३४ धावा हव्या होत्या. खूप दव पडल्याने चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार रवींद्र जडेजाने १९वी ओव्हर शिवम दुबेला दिली होती. मात्र त्याने त्या ओव्हरमध्ये २५ धावा दिल्या. यामुळे लखनऊला शेवटच्या ओव्हरमध्ये ९ धावा हव्या होत्या हे आव्हान त्यांनी ३ बॉल राखत पूर्ण केले
शिवम दुबे या पद्धतीने चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवासाठी जबाबदार ठरला होता. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि रवींद्र जडेजाचा निर्णय बॅकफायर झाला. या सामन्यात जरी नेतृत्व रवींद्र जडेजा करत असला तरी मात्र जेव्हा तो बाऊंड्रीवर फिल्डिंग करत होता तेव्हा धोनी फिल्ड सेट करत होता. जेव्हा सामना शेवटच्या दोन ओव्हरपर्यंत पोहोचला तेव्हा धोनीने हा निर्णय घेतला मात्र त्यामुळे सीएसकेचा पराभव झाला.
अधिक वाचा - 'लॉक अप' हिट झाल्यानंतर कंगनाने साधला करण जोहरवर निशाणा
चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर डेवॉन कॉनवेला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर काढले होते. यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झाला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध या सामन्यात डेवोन कॉनवेला बाहेर काढण्यात आले होते. डेवोन कॉनवेच्या जागी मोईन अलीला संधी देण्यात आली होती. आता स्पर्धेतील इतर सामन्यांमध्येही मोईन अलीचे स्थान पक्के आहे.