MS Dhoni: IPL 2022नंतर एमएस धोनी करतोय इलेक्शन ड्युटी! जाणून घ्या प्रकरण

IPL 2022
Updated May 27, 2022 | 15:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

MS Dhoni: सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल  होत आहे. या फोटोत एमएस धोनीसारखा हुहेहूब व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला लोक धोनीच म्हणत आहेत. 

ms dhoni
IPL 2022नंतर एमएस धोनी करतोय इलेक्शन ड्युटी! जाणून घ्या...  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एका व्हायरल फोटोमुळे धोनीचे नाव झारखंडमधील पंचाय निवडणुकीशी जोडले जात आहे.
  • रांचीमध्ये निवडणूक ड्युटीदरम्यान एका व्यक्तीला लोक महेंद्रसिंग दोनी समजू लागले.
  • धोनीसारखा हुबेहूब दिसणारा हा व्यक्ती विवेक कुमार आहे जो सीसीएलमधील एका डिर्पाटमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे.

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सीएसकेचा प्रवास लीगपर्यंतच होता. या हंगामात एमएस धोनीच्या(ms dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सचा(chennai super kings) संघ पॉईंट्स टेबलमध्ये ९व्या स्थानावर राहिला. धोनी झारखंडची राजधानी रांचीमध्ये(ranchi) राहणार आहे. झारखंडमध्ये सध्या पंचायत निवडणूक(panchayat election) होत आहेत. आम्ही जर तुम्हाला असे सांगितले की धोनी सध्या निवडणुकीत इलेक्शन ड्युटी करत आहे तर तुम्ही ऐकून नक्कीच हैराण व्हाल. खरंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहेत यात एक व्यक्ती हुबेहूब धोनीसारखा दिसत आहे आणि चाहते त्याला धोनीच म्हणत आहेत. Ms Dhoni doing election duty for jharkhand panchayat

अधिक वाचा - ...तर आहारात करा व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध पदार्थांचा समावेश

व्हायरल फोटोचे सत्य

एका व्हायरल फोटोमुळे धोनीचे नाव झारखंडमधील पंचाय निवडणुकीशी जोडले जात आहे. खरंतर, रांचीमध्ये निवडणूक ड्युटीदरम्यान एका व्यक्तीला लोक महेंद्रसिंग दोनी समजू लागले. धोनीसारखा हुबेहूब दिसणारा हा व्यक्ती विवेक कुमार आहे जो सीसीएलमधील एका डिर्पाटमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. त्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली असून मतमोजणी केंद्रावर ड्युटी करत आहे. विवेक कुमार यांना तिसऱ्या टप्प्यात निवडणूक ड्युटी मिळाली आहे. त्यांच्या चेहऱ्याची बनावट एमएस धोनीसारखीच आहे. 

आयपीएल २०२३मध्ये खेळणार धोनी

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२मध्ये शेवटचा सामना राजस्थानविरुद्ध खेळला होता. या सामन्यात धोनीने खुलासा केला होता की तो सीएसकेसाठीचा त्याचा शेवटचा सामना नाही तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. धोनीने म्हटले होते की निश्चितपणे हे एक सामान्य कारण आहे. चेन्नईमध्ये आपला अखेरचा सामना न खेळणे आणि चाहत्यांना धन्यवाद म्हणणे योग्य ठरणार आहे. मुंबई एक अशी जागा आहे जिथे एक टीम आणि व्यक्तीच्या रूपात मला खूप प्रेम मिळाले. धोनीने पुढे म्हटले होते की पुढील वर्षी संधी असेल जिथे टीम्स प्रवास करतील. यासाठी त्या सर्व जागांना धन्यवाद जिथे आम्ही विविध स्थानांवर खेळलो. 

अधिक वाचा - विमानात गुटख्याचा डाग पाहताच IAS अधिकाऱ्यांनी उडवली खिल्ली 

१५व्या हंगामात धोनीची कामगिरी

आयपीएल २०२२चा हंगाम धोनीसाठी चांगला राहिला. भले संघ या हंगामात काही खास कामगिरी करू शकला नाही मात्र धोनीने अनेक धमाकेदार खेळी केली. या हंगामात एमएस धोनने १४ सामन्यांत ३३.१४च्या सरासरीने २३२ धावा केल्या. या हंगामात त्याने १ अर्धशतक लगावले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी