IPL 2022:MS Dhoniचा चाहता म्हणाला, तुझ्यासाठी मी जीवही देऊ शकतो, जर...

IPL 2022
Updated May 02, 2022 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022: सनरायजर्स हैदराबाद आणि सीएसके यांच्या सामन्यात एमएस धोनीच्या चाहत्याचे अपार प्रेम पाहायला मिळाले. एकीकडे हा चाहता आपला जीव देण्यासही तयार होता. 

ms dhoni
Dhoniचा चाहता म्हणाला, तुझ्यासाठी मी जीवही देऊ शकतो, जर... 
थोडं पण कामाचं
  • धोनी (MS Dhoni) चा एक चाहता हैदराबाद आणि सीएसकेच्या सामन्यातही पाहायला मिळाला.
  • हा चाहता कॅप्टन कूलसाठी आपला जीव देण्याची गोष्ट करत होता.
  • हैदराबाद आणि सीएसके यांच्यातील सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेल्या एका चाहत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबई: क्रिकेट जगतात महेंद्रसिंग धोनी(ms dhoni) क्रेझ किती आहे हे संपूर्ण जग जाणते. धोनीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. क्रिकेट चाहते या कॅप्टन कूलचे किती दिवाने आहेत याची अनेक उदाहरणे आपण याआधी पाहिली आहेत. असेच काहीसे पुन्हा एकदा आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि सीएसकेच्या सामन्यात पाहायला मिळाले. येथे हा क्रिकेट चाहता धोनीसाठी आपला जीव देण्यासही तयार होता. Ms Dhoni fan says I will die for you if you play in heaven

अधिक वाचा - महिलांच्या या प्रमुख सवयींमुळे चिडतात पुरूष

धोनीसाठी जीव देण्यास तायर 

धोनी (MS Dhoni) चा एक चाहता हैदराबाद आणि सीएसकेच्या सामन्यातही पाहायला मिळाला. हा चाहता कॅप्टन कूलसाठी आपला जीव देण्याची गोष्ट करत होता. खरंतर सनरायजर्स हैदराबाद आणि सीएसके यांच्यातील सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेल्या एका चाहत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चाहत्याने हातात पोस्टर घेतले होते. यात पोस्टवर लिहिले होते, की जर धोनी स्वर्गात जाऊनही खेळणार तर मी मरण्यासही तयार आहे. 

धोनीसाठी चाहत्यांचे अपार प्रेम

हे काही पहिल्यांदाच घडत नाही आहे की धोनीसाठी कोणीतही इतकं प्रेम जाहीर करावं. याआधीही अनेकदा धोनीबद्दल चाहत्यांच्या मनात असे प्रेम पाहायला मिळाले आहे. अनेतदा मैदानाबाहेरून प्रेक्षक धोनीला पाहण्यासाठी मैदानात जबरदस्ती घुसतात. तर धोनीचे मोठमोठे पोस्टर बनवतात अनेक चाहते असेही आहेत त्यांनी आपल्या शरीरावर कॅप्टन कूलचा टॅटूही बनवला आहे. 

अधिक वाचा - सोन्यात गुंतवणूक कशी करावी, अक्षय तृतियेला काय कराल...

सीएसकेला चार वेळा जिंकून दिला खिताब

धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने जबरदस्त कामगिरी केली. या संघाला माहीने ४  वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. सीएसकेने धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा २०१०मध्ये नंतर २०११मध्ये त्यानंतर २०१८मध्ये सीएसके तिसऱ्यांदा चॅम्पियन बनली. त्यानंतर गेल्या हंगामात म्हणजेच २०२१मध्ये सीएसकेने चौथ्यांदा हा खिताब मिळवला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी