चेन्नईच्या विजयानंतर रडणाऱ्या छोट्या फॅनला धोनीने दिले हे स्पेशल गिफ्ट

IPL 2021
Updated Oct 11, 2021 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

MS Dhoni in Chennai super kings vs Delhi Capitals Qualifier 1: एम एस धोनी पहिल्या क्वालिफायर सामन्यात जुन्या अंदाजात दिसून आला. त्याने शानदार फॉर्ममध्ये सामना फिनिश करत आपल्या छोट्या फॅननला गिफ्ट दिले. 

ms dhoni
चेन्नईच्या विजयानंतर रडणाऱ्या फॅनला धोनीकडून स्पेशल गिफ्ट 

थोडं पण कामाचं

  • चेन्नई आणि दिल्लीत पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. 
  • चेन्नईच्या संघाने रोमहर्षक सामन्यात दिल्लीला हरवले
  • चेन्नईच्या विजयानंतर एका छोट्या चाहत्याला अश्रू आवरले नाहीत. 

MS Dhoni gifts signed ball to Crying CSK fan:चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. हा सामना खूपच रोमहर्षक ठरला. या चढ-उताराने भरलेल्या सामन्यात धोनीने एक फिनिशर म्हणून साऱ्यांची मने जिंकली. धोनी बऱ्याच काळानंतर आपल्या जुन्या अंदाजात दिसला. त्याने चेन्नईला चार विकेटने विजय मिळवून देत फायनलला पोहोचवले. धोनीने चौकार ठोकत सीएसकेचा विजय साजरा केला. त्याने सातव्या स्थानावर फलंदाजीला येत ६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १८ धावा केल्या. माहीने सामना संपल्यानंतर एका इमोशनल झालेल्या छोट्या फॅनला स्पेशल गिफ्ट दिले. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

छोट्या चाहत्याला मिळाले हे गिफ्ट...

चेन्नई आणि दिल्लीच्या सामन्यादरम्यान टीव्ही कॅमेऱ्यात एक छोटी फॅन भावूक झालेली दिसली. या छोट्या फॅनचा संपूर्ण सामन्यादरम्यान धोनीला सपोर्ट होता. एका क्षण असा आला की जेव्हा वाटू लागले की सीएसकेचा पराभव होत आहे तेव्हा ही छोटी फॅन रडू लागली. दरम्यान, त्याच क्षणी धोनी धावत आला. त्याने ताबडतोब फलंदाजी करताना सीएसकेला जिंकून दिले. धोनीने चौकार ठोकत जेव्हा चेन्नईला विजय मिळवून दिला तेव्हा तिचे आनंदाश्रू निघाले. अशातच धोनी आपल्या या छोट्या फॅनला पाहून स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने सामन्यानंतर बॉलवर सही करत स्पेशल गिफ्ट फॅनला दिले. 

सलामी फलंदाज पृथ्वी शॉ६० धावा आणि कर्णधार ऋषभ पंतच्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्समोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इतका मजबूत स्कोर असतानाही दिल्लीला बचाव करता आला नाही. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ७० धावा आणि रॉबिन उथप्पाने ६३ धावा करत शानदार फलंदाजी केली. मोईन अलीने १६ धावा केल्या. त्यानंतरची कसर धोनीने भरून काढली. चेन्नईचा संघ नवव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. याचा फायनल सामना १५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी