रांची: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनीचा(ms dhoni) दबदबा अद्याप कायम आहे. खरंतर, धोनीने रिटायरमेंट(retirement) जरी घेतली असली तरी त्याच्या उत्पन्नावर(income) कोणताही परिणाम झालेला नाही. गेल्या एका वर्षात त्याच्या उत्पन्नात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली. आयकर विभागाकडून त्याच्याकडून जमा करण्यात आलेला अॅडव्हान्स टॅक्स याचा पुरावा देतात.त्याने २०२१-२२ या वर्षासाठी आयकर विभागाला अॅडव्हान्स टॅक्स म्हणून ३८ कोटी दिले आहेत. तर गेल्या वर्षी २०२०-२१मध्ये ही रक्कम ३० कोटी इतकी होती. MS Dhoni income increase in last year
अधिक वाचा - कधीपासून सुरू झाला April Fool जाणून घ्या
आयकर विभागाच्या उच्च पदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार महेंद्र सिंग धोनी यावर्षातील झारखंडमधील सर्वात मोठा टॅक्सपेयर ठरला आहे. तज्ञांच्यामते धोनीकडून जमा करण्यात आलेले ३८ कोटी अॅडव्हान्स टॅक्सच्या आधारावर २०२१-२२मध्ये त्याचे उत्पन्न १३० कोटींच्या जवळपास असावे. आयकर विभागाकडून धोनीने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय करिअरला सुरूवात केली तेव्हापासून झारखंडमध्ये व्यक्तीगत श्रेणीमधील तो सर्वात मोठा आयकरदाता आहे.
२०१९-२०मध्ये धोनीने २८ कोटी, त्याआधी २०१८-१९मध्ये साधारणपणे हीच रक्कम टॅक्स म्हणून भरली होती. याआधी २०१७-१८मध्ये त्याने १२.१७ कोटी, २०१६-१७मध्ये १०.९३ कोटी इनकम टॅक्स भरला होता. १५ ऑगस्ट २०२०मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले मात्र धोनी बिझनेसच्या पिचवर शानदार गोलंदाजी करत आहे.
अधिक वाचा - २५ फटके मारण्याची धमकी देत शिक्षकाने केला मुलीवर अत्याचार
दरम्यान क्रिकेटर म्हणून आयपीएलशी त्याचे नाते कायम आहे. माजी कर्णधार धोनीने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. स्पोर्ट्स वेअर, होमइंटीरियर कपनी होमलेन, जुन्या कारची खरेदी विक्री करणारी कंपनी कार्स २४, स्टार्टअप कंपनी खाताबुक, स्पोर्ट्स कंपनी रन एडम, क्रिकेट कोचिंग आणि ऑरगॅनिक फार्मिंगमध्येही त्याने गुंतवणूक केलेली आहे. रांचीमध्ये तो ४३ एकर जमिनीत ऑरगॅनिक शेती करतो.