अखेर धोनीने केला खुलासा, कधीपर्यंत खेळणार आयपीएल

IPL 2021
Updated Oct 06, 2021 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेर सांगितलेच की तो आयपीएलला कधी अलविदा करणार. 

ms dhoni
अखेर धोनीने केला खुलासा, कधीपर्यंत खेळणार आयपीएल 
थोडं पण कामाचं
  • महेंद्रसिंग धोनीने केला खुलासा, आयपीएलमधून कधी घेणार निवृत्ती
  • चाहत्यांनी दिला विश्वास, चेन्नईमध्ये खेळणार आयपीएलच्या करिअरमधील अंतिम सामना
  • पुढील आयपीएलच्या हंगामात चेन्नईत होऊ शकतात मोठे बदल

MS Dhoni IPL retirement: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने हे स्पष्ट केले की तो कमीत कमी आणखी एका सत्रात आपल्या आवडीची पिवळी जर्सी घालणार आणि  ‘व्हिसल पोडु (सीएसकेचे चाहते)’निश्चितपणे आपल्या प्रिय चेपॉक मैदानात अलविदा सामना खेळताना पाहू शकेल. धोनीच्या निवृत्तीवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती.मात्र मंगळवारी त्याने पहिल्यांदा स्पष्ट संके दिले की तो आगामी सत्रात खेळताना दिसणार आहे कारण आयपीएलच्या पुढील लिलावात मोठे बदल होणार आहेत. 

धोनीने इंडिया सिमेंट्सच्या ७५व्या जल्लोषानिमित्त चाहत्यांशी बोलताना सांगितले, जोपर्यंत निवृत्तीची गोष्ट आहे तर तुम्ही आजही येऊ शकता आणि सीएसकेसाठी खेळताना पाहू शकता आणि हा माझा शेवटचा सामना असू शकतो. तुम्हाला मला अलविदा म्हणण्याची संधी मिळेल. मला आशा आहे की आम्ही चेन्नईत खेळू आणि तेथील चाहत्यांना भेटू शकतो. 

सूत्रांच्या माहितीनुसार सीएसके पुढील लिलावासाठी तीन खेळाडू - कर्णधार धोनी, ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड यांन संघासोब कायम ठेवू शकतात. धोनीमे २०१९नंतर चेन्नईमध्ये आयपीएलचा एकही सामना खेळलेला नाही. 

धोनीचा विक्रम

चेन्नईचा कॅप्टन आणि विकेटकीपर असलेल्या धोनीने हैदराबाद विरुद्धच्या या मॅचमध्ये तीन कॅच घेतले. एकाच मॅचमध्ये तीन किंवा जास्त कॅच घेण्याची कामगिरी धोनीने आयपीएलमध्ये दहाव्यांदा केली. आयपीएलमध्ये एका मॅचमध्ये तीन किंवा जास्त कॅच घेण्याची कामगिरी दहा वेळा करणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. धोनीने चौथ्या ओव्हरमध्ये हेझलवूडच्या बॉलवर जेसन रॉयचा कॅच घेतला. नंतर अकराव्या ओव्हरमध्ये ब्राव्होच्या बॉलवर प्रियम गर्गचा कॅच घेतला आणि तेराव्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाच्या बॉलवर वृद्धिमान साहाचा कॅच घेतला. 

सर्वाधिकवेळा एका आयपीएल डावात ३+ झेल घेणारे क्रिकेटपटू

  1. १० वेळा – एमएस धोनी
  2. ५ वेळा – एबी डिविलियर्स
  3. ४ वेळा – रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, क्विंटन डी कॉक, पार्थिव पटेल, मनिष पांडे, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी