CSK vs MI, IPL Final: धोनी रनआऊट होता की नाही? चर्चेला उधाण पण टीमचं नुकसान

IPL 2019
Updated May 13, 2019 | 13:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अंपायरला निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागला कारण कॅमेरा अँगलमुळे गोंधळ झाला. धोनीची बॅट क्रीजच्या आत होती की नाही. सीएसकेला धोनी आऊट झाल्यानं जोरदार झटका बसला आणि त्यांनी मॅच गमावली... जाणून घ्या मॅचमध्ये काय घडलं

Mahendra Singh Dhoni
धोनीचा रनआऊट  |  फोटो सौजन्य: AP

हैदराबाद: चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन एम. एस. धोनीचा रविवारी झालेला वादग्रस्त रनआऊट एक चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर आयपीएल २०१९ ची फायनल मॅच खेळली गेली. या मॅचमध्ये धोनीला टिव्ही अंपायर नायजेल लाँग यांनी रनआऊट करार केला. मात्र रिप्लेमध्ये हे स्पष्ट होत नव्हतं की धोनी रनआऊट आहे की नाही. क्रिकेट नियमांबाबत बोलायचं झालं तर अशी संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली तर निर्णय बॅट्समनच्या बाजूनं लागतो, मात्र रविवारी धोनीच्या बाजूनं नाही तर विरोधात निर्णय झाला.

चेन्नई सुपरकिंग्जची टीम १५० रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करत होती. मुंबई इंडियन्सच्या बॉलरनं सुरेश रैनाला ८ रन्सवर आणि अंबाती रायुडूला अवघ्या १ रनावर आऊट केलं. त्यामुळं चेन्नईच्या टीमवर दबाव वाढला होता. जेव्हा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी बॅटिंग करायला आला तेव्हा मॅच बरोबरीत सुरू होती. त्यावेळी चेन्नईचा स्कोअर ७३ रन्सवर ३ विकेट असा होता. हार्दिक पांड्या मॅचमधील १३ वा ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर शेन वॉटसननं शॉर्ट स्क्वायर लेगच्या दिशेनं शॉट मारला आणि रन घेण्यासाठी तो धावला.

तिथं लसिथ मलिंगानं चुकीचा थ्रो केला आणि बॉल लाँग ऑफच्या फील्डरकडे गेला. धोनीनं ओव्हरथ्रोवर रन घेण्याचं ठरवलं. ईशान किशननं बरोबर थ्रो मारला आणि बॉल सरळ स्टंपवर लागला. मुंबईनं रनआऊटची जोरदार अपील केली. मैदानावरील अंपायरनं तिसऱ्या अंपायरच्या हाती निर्णय सोपवला.

टिव्ही अंपायरनं अनेक वेळा रिप्ले पाहिला आणि अनेक कॅमेऱ्यांनी अँगल पण तपासले. पण ते गोंधळात दिसले की धोनीची बॅट क्रीजच्या आत पोहचलीय की नाही. अशावेळी अनेकदा पाहिलं गेलंय की बॅट्समनला फायदा होतो, मात्र धोनीच्या बाबतीत ते झालं नाही. अनेक रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या अंपायरनं फील्डिंग टीमच्या बाजूनं निर्णय दिला आणि धोनी आऊट झाला.

खरं तर रिप्लेपाहून अनेकदा शंका निर्माण होत होती की धोनीची बॅट क्रीजच्या आत पोहोचली की नाही, आशा होती की धोनीला या गोंधळाचा फायदा मिळेल आणि तो बॅटिंग करणं सुरू ठेवेल. नंतर मात्र तिसऱ्या अंपायरनं आपल्या निर्णयानं क्रिकेट फॅन्सना आश्चर्यात टाकलं. अंपायरनं धोनीला रनआऊट दिलं.

धोनीच्या विकेटचं नुकसान चेन्नई सुपरकिंग्जला आयपीएल २०१९चा खिताब गमावून भोगावा लागला. मुंबई इंडियन्सनं या रोमांचकारी मॅचमध्ये चेन्नईला अवघ्या १ रननं हरवलं. मुंबईनं पहिले बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन्स केले होते. उत्तरादाखल मैदानात दाखल झालेल्या चेन्नईच्या टीमला २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १४८ रन्स करता आले आणि आपल्या हातून आयपीएल २०१९ चा खिताब जिंकण्याची संधी गमवावी लागली.आता धोनीच्या या रनआऊटवरून बरीच चर्चा रंगली आहे. अनेकांचं म्हणणं आहे धोनीवर अन्याय झाला आहे. तो रनआऊट झाला नव्हता.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
CSK vs MI, IPL Final: धोनी रनआऊट होता की नाही? चर्चेला उधाण पण टीमचं नुकसान Description: अंपायरला निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागला कारण कॅमेरा अँगलमुळे गोंधळ झाला. धोनीची बॅट क्रीजच्या आत होती की नाही. सीएसकेला धोनी आऊट झाल्यानं जोरदार झटका बसला आणि त्यांनी मॅच गमावली... जाणून घ्या मॅचमध्ये काय घडलं
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola