IPL 2022: सामन्यानंतर धोनीचा मोठा खुलासा, Ravindra Jadejaने नेतृत्व सोडल्याचे सांगितले कारण

IPL 2022
Updated May 02, 2022 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

MS Dhoni On Ravindra Jadeja:चेन्नई सुपर किंग्स (CSK)ने सनरायजर्स हैदराबादला १३ धावांनी हरवत आयपीएलमध्ये तिसरा विजय मिळवला. सामन्यानंतर कर्णधार म्हणून परतलेल्या महेंद्रसिंग धोनीने जडेजाबाबत मोठे विधान केले. 

ms dhoni
धोनीचा मोठा खुलासा, Jadejaने नेतृत्व सोडल्याचे सांगितले कारण 
थोडं पण कामाचं
  • चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादला १३ धावांनी हरवले.
  • सामन्यानंतर धोनीने रवींद्र जडेजाबाबत मोठे विधान केले. 
  • कर्णधार बनल्यानंतर अपेक्षा खूप वाढतात. यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. हेच त्याच्यासोबतही झाले.

मुंबई: चेन्नई सुपर किंग्सचे(chennai super kings) कर्णधारपद मिळाल्यानंतर विजयी सुरूवात करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने(ms dhoni) सांगितले की मी काही वेगळे केले नाही. कारण कर्णधार बदलण्याने काही वेगलळे होते. चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादला(sunrisers hyderabad) १३ धावांनी हरवले. सामन्यानंतर धोनीने रवींद्र जडेजाबाबत(ravindra jadeja) मोठे विधान केले. MS Dhoni statement about ravindra jadeja captaincy

अधिक वाचा - रशियन मुली पाठवा, BJP महिला नेत्याच्या पतीचा ऑडियो व्हायरल

धोनीने केले हे विधान

सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंंग धोनीने सांगितले, आमचा स्कोर चांगला होता आणि गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. खासकरून सातव्या ओव्हर्सपासून ते १४व्या ओव्हरपर्यंत स्पिनर्सची कामगिरी चागंली राहिली होती यामुळे विजय मिळू शकला. रवींद्र जडेजाच्या नेतृत्व सोडण्याबाबत धोनी म्हणाला, जडेजाला गेल्या हंगामातच माहीत होते की तो या हंगामात कर्णधार असेल. पहिल्या दोन सामन्यांत मी त्याला मदतही केली मात्र त्यानंतर मी त्याला कर्णधाराच्या नात्याने निर्णय घेण्यास सांगितले. मी त्याला सांगितले की आता तो कर्णधार आहे आणि त्याला निर्णय घ्यावे लागतील आणि जबाबदारीही. 

जडेजाच्या खेळावर होत होता परिणाम

महेंद्रसिंग धोनी म्हणाला, कर्णधार बनल्यानंतर अपेक्षा खूप वाढतात. यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. हेच त्याच्यासोबतही झाले. त्याच्या तयारीवर परिणाम झाला. बॉल आणि बॅटने तो पहिल्यासारखा खेळू शकत नव्हता. धोनीने पुढे सांगितले, जर तुम्ही नेतृत्व सोडता आणि फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करता तर ते माझ्यासाठी चांगले आहे. आम्ही एक चांगल्या फिल्डरलामिस करत आहोत. मिड विकेटवर एका चांगल्या फिल्डरची कमतरता आम्हाला जाणवतेय. 

अधिक वाचा - सोन्यात गुंतवणूक कशी करावी, अक्षय तृतियेला काय कराल...

विल्यमसन्सचा टीमला हा सल्ला

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन्सने सांगितले, त्यांच्या संघाला प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी करण्यास शिकावे लागेल. विल्यमसन्स म्हणाला, २०० धावांचे लक्ष्य मिळवणे आमच्याासाठी आव्हानात्मक असते. त्यांनी चांगली फलंदाजी केली. आम्हाला विषम स्थिती चांगला खेळ करावा लागेल. चेन्नईने २ बाद २०२ धावा केल्या. तर सनरायजर्स हैदराबादला १३ धावांनी पराभव सहन करावा लागला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी