Ishan Kishan: CSKच्या खेळाडूची धोकादायक बॉलिंग, तोंडावर पडला इशान किशन, हवेत उडाला स्टम्प

IPL 2022
Updated Apr 21, 2022 | 22:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mukesh Choudhary: मुंबई इंडियन्सविरुद्ध मुकेश चौधरीने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित आणि इशान किशनला पॅव्हेलियनमध्ये धाडले. 

ishan kishan
CSKच्या खेळाडूची धोकादायक बॉलिंग, हवेत उडाला स्टम्प 
थोडं पण कामाचं
  • मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) ने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये धाडले
  • बॉलवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये धाडले. या
  • मुकेशचा यॉर्कर लेंथ बॉल इशान किशन नीट खेळू शकला नाही..

मुंबई: आयपीएल २०२२(IPL 2022)च्या ३३व्या सामन्यात यावेळेस चेन्नई सुपर किंग्स(CSK) आणि मुंबई इंडियन्स(Mumbai Indians)आमनेसामने आहेत. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने(Ravindra Jadeja) टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नईसाठी मुकेश चौधरीने(Mukesh Choudhary) ने जबरदस्त खेळ केला. mukesh choudhary bold to ishan kishan

अधिक वाचा - प्रतापगडच्या पराक्रमाची गाथा 'शेर शिवराज' उद्या होणार रिलिज

इशान किशनला केले आऊट 

मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) ने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये धाडले. या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर मुकेश चौधरीने इशान किशनवर बॉल फेकला. मुकेशचा यॉर्कर लेंथ बॉल इशान किशन नीट खेळू शकला नाही.. बॉल इतका जबरदस्त होता की इशान किशनकडे त्याचे उत्तर नव्हते. बॉल खेळताना इशान किशन तोंडावर पडला. बॉल जेव्हा विकेटवर लागला तेव्हा स्टम्प दोन वेळा हवेत उडाला. इशान किशन आपले खातेही खोलू शकला नाही. 

स्वस्तात माघारी परते दोन सलामीवीर

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सची सुरूवात खूपच खराब राहिली. जेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन स्वस्तात माघारी परतले. दोघांनाही आपले खाते खोलता आले नाही. डेवाल्ड ब्रेविसने ४ धावा केल्या. सूर्यकुमार यादव काही वेळ विकेटवर टिकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. किरेन पोलार्डने १४ धावा केल्या.

अधिक वाचा - IPL: ३ मॅच, ३ विजय, तीन वेळा एकच खेळाडू मॅन ऑफ दी मॅच

दोन्ही संघांनी मिळून ९वेळा जिंकलाय खिताब

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी मिळून आतापर्यंत ९ वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेला आहे. पाच वेळा मुंबईने तर चार वेळा चेन्नईने हा खिताब जिंकला आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ खराब कामगिरी करत आहेत. मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या ६ सामन्यांत पराभव स्वीकारलाय तर दुसरीकडे चेन्नईला केवळ आतापर्यंत एकच विजय मिळवता आलाय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी