फायनलमध्ये भिडणार दोन मुंबईकर कॅप्टन

Mumbai Indians and Delhi Capitals both teams lead by Mumbaikar cricketer IPL फायनलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमचे नेतृत्व मुंबईकर क्रिकेटपटूंच्या हाती आहे.

Mumbai Indians and Delhi Capitals both teams lead by Mumbaikar cricketer
फायनलमध्ये भिडणार दोन मुंबईकर कॅप्टन 

थोडं पण कामाचं

  • फायनलमध्ये भिडणार दोन मुंबईकर कॅप्टन
  • मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे
  • चार वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई आणि पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचलेली दिल्ली यांच्यात रंगणार मॅच

दुबई (Dubai): आयपीएल २०२० (IPL 2020) स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये (Final) मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीम समोरासमोर असतील. फायनल मॅच दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मॅचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही टीमचे कॅप्टन हे मुंबईकर क्रिकेटपटू आहेत. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करत आहे. (Mumbai Indians and Delhi Capitals both teams lead by Mumbaikar cricketer) 

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत सर्वात आधी मुंबई इंडियन्सची टीम प्ले ऑफ फेरीत दाखल झाली. या फेरीतून विजय मिळवत थेट फायनलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम पोहोचली. आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीत दाखल झालेली दुसऱ्या क्रमांकाची टीम होती दिल्ली कॅपिटल्स. 

प्ले ऑफ फेरीत पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये ५७ धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सला नियमाप्रमाणे क्वालिफायर टू मॅच खेळण्याची संधी मिळाली. तर एलिमिनेटर मॅचमध्ये ६ विकेट राखून जिंकलेल्या सनरायजर्स हैदराबादला क्वालिफायर टू मॅच खेळण्याची संधी मिळाली. एलिमिनेटरमध्ये पराभूत झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्पर्धेतील आव्हान संपले. अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर क्वालिफायर टू मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांची टक्कर झाली. ही मॅच १७ धावांनी जिंकून दिल्ली कॅपिटल्सने फायनलमध्ये प्रवेश केला. सनरायजर्स हैदराबादचे आव्हान क्वालिफायर टू मॅचमधील पराभवामुळे संपले. 

फायनल मॅचमध्ये यंदाच्या आयपीएल २०२० स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीम समोरासमोर येतील. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. यामुळे पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये एकमेकांसमोर उभ्या असलेल्या दोन्ही टीमचे कॅप्टन हे मुंबईकर क्रिकेटपटू आहेत. हा अनोखा योग साधल्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी विजयानंतर ट्रॉफी हातात उंचावणारा कॅप्टन हा मुंबईकर असेल.

मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएल जिंकली. आतापर्यंत बारा आयपीएल स्पर्धा झाल्या आहेत. यंदाची तेरावी आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब आमिराती येथे सुरू आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांपैकी सर्वाधिक वेळा स्पर्धा जिंकलेला संघ अशी मुंबई इंडियन्सची ख्याती आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माचा प्रयत्न यंदाची स्पर्धा जिंकण्याचा आहे. 

याउलट परिस्थिती दिल्लीची आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व आधी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू रिकी पॉटिंग करत होता. आता श्रेयस अय्यर नेतृत्व करत आहे. कॅप्टन बदलले तरी दिल्लीने अद्याप एकदाही आयपीएल जिंकलेली नाही. आयपीएल स्पर्धेची सुरुवात २००८ मध्ये झाली. स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंतची दिल्ली कॅपिटल्सने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी कधीही दिल्ली फायनलमध्ये धडकलेली नाही. त्यामुळे दिल्ली आयपीएल जिंकणार का, याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने दुखापतीमुळे काही मॅचमध्ये विश्रांती घेतली. स्पर्धेतील ११ मॅचमध्ये त्याने २६४ धावा केल्या. यात ८० ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने २ अर्धशतके झळकावली. तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने १६ मॅचमध्ये ४५४ धावा केल्या. यात नाबाद ८८ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने २ अर्धशतके झळकावली. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरपैकी कोणता कॅप्टन यंदाच्या आयपीएलची ट्रॉफी हाती घेणार याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी