पोलार्ड इफेक्ट, मुंबईचा विजय

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated May 02, 2021 | 01:11 IST

अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या आयपीएलच्या २७व्या लीग मॅचमध्ये कायरन पोलार्डच्या (३४ बॉल खेळून नाबाद ८७ धावा; ६ चौकार आणि ८ षटकार) तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मॅच जिंकली.

Mumbai Indians beat Chennai Super Kings by 4 wickets  
पोलार्ड इफेक्ट, मुंबईचा विजय 

थोडं पण कामाचं

  • पोलार्ड इफेक्ट, मुंबईचा विजय
  • कायरन पोलार्डच्या (३४ बॉल खेळून नाबाद ८७ धावा; ६ चौकार आणि ८ षटकार) तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने मॅच जिंकली
  • धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईच्या सलामीवीरांनी छान सुरुवात केली

नवी दिल्ली: अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या आयपीएलच्या २७व्या लीग मॅचमध्ये कायरन पोलार्डच्या (३४ बॉल खेळून नाबाद ८७ धावा; ६ चौकार आणि ८ षटकार) तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मॅच जिंकली. मुंबईने चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धची मॅच ४ विकेट राखून जिंकली. Mumbai Indians beat Chennai Super Kings by 4 wickets  

टॉस जिंकून मुंबईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने २० ओव्हरमध्ये ४ बाद २१८ धावा केल्या. मुंबईने २० ओव्हरमध्ये ६ बाद २१९ धावा करुन मॅच ४ विकेट राखून जिंकली. 

धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईच्या सलामीवीरांनी छान सुरुवात केली. त्यांनी ७० धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबई सुरुवातीपासूनच आक्रमक खेळू शकली. रोहित शर्मा ३५ धावा, सूर्यकुमार यादव ३ धावा, क्विंटन डी कॉक ३८ धावा, कृणाल पांड्या ३२ धावा, कायरन पोलार्ड नाबाद ८७ धावा, जेम्स नीशाम शून्य धावा, धवल कुलकर्णी नाबाद शून्य धावा यांच्या जोरावर मुंबईने सहज विजय मिळवला. चेन्नईकडून सॅम करणने ३ तर मोईन अली, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सलामीची जोडी लवकर फुटली. ऋतुराज गायकवाड ४ धावा करुन परतला. पण फाफ डु प्लेसिस आणि मोईन अली या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. मोईन अलीने ३६ बॉल खेळून ५८ धावा केल्या तर फाफ डु प्लेसिसने २८ बॉल खेळून ५० धावा केल्या. सुरेश रैना २ धावा करुन परतला. अंबाती रायुडूने २७ बॉल खेळून नाबाद ७२ धावा केल्या. रविंद्र जडेजा २२ धावांवर नाबाद राहिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी