क्विंटन डी कॉकची कमाल, मुंबईचा विजय

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 30, 2021 | 00:55 IST

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २४व्या लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर सात विकेट राखून विजय मिळवला.

Mumbai Indians beat Rajasthan Royals by 7 wickets
क्विंटन डी कॉकची कमाल, मुंबईचा विजय 

थोडं पण कामाचं

  • क्विंटन डी कॉकची कमाल, मुंबईचा विजय
  • मुंबईचा राजस्थानवर विजय
  • क्विंटन डी कॉकची अप्रतिम खेळी

नवी दिल्ली: अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २४व्या लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर सात विकेट राखून विजय मिळवला. क्विंटन डी कॉकने ५० बॉल खेळून नाबाद ७० धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर क्विंटन डी कॉकने ही कमाल केली. त्याच्या शानदार खेळीमुळे मुंबईचा विजयाचा मार्ग सोपा झाला. Mumbai Indians beat Rajasthan Royals by 7 wickets

कर्णधार रोहित शर्मा १४ धावा करुन बाद झाला. पण क्विंटन डी कॉकने मॅचची सूत्रं हाती घेत अखेरपर्यंत अप्रतिम फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने दहा बॉल खेळून १६ तर कृणाल पांड्य़ाने २६ बॉल खेळून ३९ धावा तसेच कायरन पोलार्डने ८ बॉलमध्ये नाबाद १६ धावा करुन क्विंटन डी कॉकला उत्तम साथ दिली. यामुळेच मुंबईने १८.३ ओव्हरमध्येच तीन बाद १७२ धावा करुन विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सच्या ख्रिस मॉरिसने दोन तर मुस्तफिझुर रेहमानने एक विकेट घेतली.

याआधी टॉस जिंकून मुंबईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने वीस ओव्हरमध्ये चार बाद १७१ धावा केल्या. राजस्थानच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी केली. जोस बटलर ४१ तर यशस्वी जयस्वाल ३२ धावा करुन बाद झाला. संजू सॅमसन ४२ धावा करुन परतला. शिवम दुबेने ३५ धावांची खेळी केली. डेव्हिड मिलर (नाबाद ७ धावा) आणि रियान पराग (नाबाद ८ धावा) हे दोघे नाबाद राहिले. मुंबईकडून राहुल चहरने दोन तर जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी