मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 17, 2021 | 23:49 IST

Mumbai Indians beat Sunrisers Hyderabad by 13 runs एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२१च्या नवव्या लीग मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला.

Mumbai Indians beat Sunrisers Hyderabad by 13 runs
मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक 

थोडं पण कामाचं

  • मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक
  • मुंबईने मॅच १३ धावांनी जिंकली
  • मुंबईच्या राहुल चहर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी ३ तर बुमराह आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली

चेन्नई: एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२१च्या नवव्या लीग मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला. हा मुंबई इंडियन्स संघाचा सलग दुसरा विजय आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. त्यांनी पराभवाची हॅटट्रिक केली. मुंबईने मॅच १३ धावांनी जिंकली. सनरायझर्स हैदराबादला १५१ धावा करायच्या होत्या. पण त्यांचा डाव १९.४ ओव्हरमध्ये १३७ धावांत आटोपला. Mumbai Indians beat Sunrisers Hyderabad by 13 runs

मुंबई इंडियन्स संघाने आज टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० ओव्हरमध्ये ५ बाद १५० धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने ३९ चेंडूत ४० धावा तर रोहित शर्माने २५ चेंडूत ३२ धावा केल्या. दमदार अर्धशतकी सलामी मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सहा चेंडूत दहा तर इशान किशनने २१ चेंडूत १२ धावा केल्या. कायरन पोलार्डने २२ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. हार्दिक पांड्याने पाच चेंडूत सात तर कृणाल पांड्याने तीन चेंडूत नाबाद तीन धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून विजय शंकर आणि मुजीब उर रेहमान या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर खलील अहमदने एक विकेट घेतली.

सनरायझर्स हैदराबादने धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगली सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नरने ३४ चेंडूत ३६ तर जॉनी बेअरस्टोने २२ चेंडूत ४३ धावा केल्या. पण नंतर विजय शंकरचा अपवाद वगळता एकही फलंदाज जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. मनिष पांड्ये सात चेंडूत दोन तर विराट सिंह बारा चेंडूत अकरा धावा करू शकला. विजय शंकरने २५ चेंडूत २८ धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा दोन, अब्दुल समद सात, राशिद खान शून्य, भुवनेश्वर कुमार एक, मुजीब उर रेहमान नाबाद एक आणि खलील अहमद एक धावा करु शकले. 

मुंबई इंडियन्सकडून राहुल चहर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी तीन तर जसप्रित बुमराह आणि कृणाल पांड्या या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समद हे सनरायझर्स हैदराबादचे दोन फलंदाज धावचीत झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी