Mumbai Indians: आयपीएल २०२२चा(ipl 2022) हंगाम अतिशय रोमहर्षक पद्धतीने पुढे सरकत आहे. पॉईंट टेबल(point table) प्रत्येक सामन्यागणिक बदलत आहे. आणि सर्व संघांच्या नजरा प्लेऑफच्या(play off) शर्यतीत आहेत. तर ५ वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ सलग ७ पराभवानंतर साधारण आयपीएलबाहेरच गेला आहे. आमच्या या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला मुंबई आणि सीएसके यांच्यातील सामन्यानंतर लीग टेबलची स्थिती काय आहे हे सांगणार आहोत. mumbai indians can reach in play off of ipl 2022?
अधिक वाचा - नाभीत तूप टाकल्यानं होतात अनेक फायदे
मुंबई इंडियन्सा सीएसकेविरुद्दध गुरूवारी झालेल्या सामन्यात ३ विकेटनी हार पत्करावी लागली. सलग ७वा सामना हरल्यानंतर मुंबईचा संघ प्ले ऑफमधून बाहेरच गेला आहे. मात्र मुंबईकडे थोडीशी आशा आहे की ते आपले उरलेले सर्व सामने जिंकतील आणि बाकी संघ हरण्याची प्रतीक्षा करतील. सध्याची परिस्थिती पाहता हे अशक्यच वाटतं आहे.
तर मुंबईला हरवू न सीएसकेने आपला दुसरा सामना कसाबसा जिंकला. ७ सामन्यांमध्ये सीएसकेचे आता ४ पॉईंट्स आहेत तर त्यांच्यासाठीही आता पुढील सामने करो की मरो असणार आहेत. अशातच सीएसकेसाठीही प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहणे खूपच कठीण दिसत आहे. आरसीबी आणि गुजरात १०-१० अंकांसह टेबलमध्ये अव्वल आहेत आणि हे दोन्ही संघ खिताब जिंकण्याचे सर्वात मोठे दावेदार आहेत.
अधिक वाचा - राणा कुटुंबाने मातोश्री बाहेर जाऊनच दाखवावे
तर राजस्थान रॉयल्स ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर, लखनऊ सुपर जायंट्स ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आणि सनरायजर्स हैदराबाद ८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि पंजाब किंगसाच अनुक्रमे नंबर येतो. यावेळेस सीएसके आणि मुंबईचा संघ सोडला असता सर्व ८ संघांसाठी लीग टेबल पूर्णपणे खुले आहे आणि ते आरामात प्लेऑफमध्ये आपली जागा मिळवू शकतात. मात्र सीएसके आणि मुंबईकडे आपले सर्व सामना जिंकण्याशिवाय कोणताही चान्स नाही.