मुंबई: मुंबई इंडियन्सचा कर्णधार (Mumbai Indians) रोहित शर्मा (Rohit Sharma) साठी अडचणी वाढत चालल्या आहेत. खरंतर, रोहित शर्मावर एका सामन्याची बंदी लागू शकते. बुधवारी पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी रोहित र्मावर २४ लाख रूपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
अधिक वाचा - जंगलात शिकारीला गेलेल्या चौघांनी घोरपडीवर केला रेप
तर, मुंबई इंडियन्सच्या बाकी खेळाडूंवर ६ लाख अथवा २५ टक्के मॅच ज्यापैकी कमी असेल तितका दंड ठोठावला जाईल. मुंबई इंडियन्सा संघ आणि त्याचा कर्णधार रोहित शर्मावर या आयपीएलच्या हंगामात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार आहे.
जर तिसऱ्यांदा मुंबई इंडियन्सचा संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला तर नियमांतर्गंत रोहित शर्मावर ३० लाखांचा दंड ठोठावण्यासोबतच एका सामन्याची बंदीही लागू शकते. जर रोहित शर्मावर ही बंदी लागली तर मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हा सगळ्यात मोठा झटका असेल.
अधिक वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
स्लो ओव्हर रेटच्या नियमानुसार जर एखादा संघ हंगामात पहिल्यांदा ही चूक करत असेल तर कर्णधारावर १२ लाखांचा दंड लागतो. तर दुसऱ्यांदा ही चूक केल्यास कर्णधारासह प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील असलेल्या खेळाडूंना दंड भरावा लागतो. चूक पुन्हा केल्याने कर्णधारावर दंडापैकीची रक्कम २५ लाख असू शकते तर बाकी खेळाडूंना ६ लाख अथवा २५ टक्के मॅच फीस जी कमी असेल तितकी भरावी लागते. जर एखादा संघ हंगामात तीन वेळा एकच चूक करत असेल तर कर्णधारावर ३० लाख रूपयांचा दंड सोबतच एका सामन्यावर बंदी आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील खेळाडूंवर १२ लाख अथवा ५० टक्के मॅच फी यापैकी जी कमी असेल तितका दंड ठोठावला जातो.