रोहित शर्मा फायनलच्या निमित्ताने २००वी आयपीएल मॅच खेळणार

Mumbai Indians captain Rohit Sharma set to join MS Dhoni in elite list रोहित शर्मा फायनलच्या निमित्ताने २००वी आयपीएल मॅच खेळणार

Mumbai Indians captain Rohit Sharma set to join MS Dhoni in elite list
रोहित शर्मा फायनलच्या निमित्ताने २००वी आयपीएल मॅच खेळणार 

थोडं पण कामाचं

  • रोहित शर्मा फायनलच्या निमित्ताने २००वी आयपीएल मॅच खेळणार
  • आयपीएलमध्ये २०० मॅच खेळणारा रोहित हा दुसरा खेळाडू
  • रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चार वेळा जिंकली आयपीएल

मुंबईः मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आणि मुंबईकर क्रिकेटपटू असलेला रोहित शर्मा मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी २००वी आयपीएल मॅच खेळणार आहे. विशेष म्हणजे ही यंदाच्या आयपीएल स्पर्धेची फायनल मॅच आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीम समोरासमोर असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन मुंबईकर क्रिकेटपटू आहेत. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे आणि श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. (Mumbai Indians captain Rohit Sharma set to join MS Dhoni in elite list)

आयपीएलमध्ये २०० मॅच खेळणारा रोहित हा दुसरा खेळाडू

आयपीएलमध्ये २०४ मॅच खेळण्याची कामगिरी चेन्नई सुपरकिंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे. धोनी नंतर २०० आयपीएल मॅच खेळणारा दुसरा खेळाडू होण्याचा मान रोहित शर्मा मिळवत आहे. धोनीने २०४ मॅच खेळत ४६३२ धावा केल्या आहेत. यात २३ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने २०१०, २०११ आणि २०१८ अशी तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तर आतापर्यंत १९९ आयपीएल मॅच खेळलेल्या रोहित शर्माने ५१६२ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चार वेळा जिंकली आयपीएल

आयपीएलमध्ये २००वी मॅच खेळत असलेल्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्स या एकाच टीमकडून १५० पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएल जिंकली. आतापर्यंत बारा आयपीएल स्पर्धा झाल्या आहेत. यंदाची तेरावी आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब आमिराती येथे सुरू आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या टीमपैकी सर्वाधिक वेळा स्पर्धा जिंकलेली टीम अशी मुंबई इंडियन्सची ख्याती आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माचा प्रयत्न यंदाची स्पर्धा जिंकण्याचा आहे. 

रोहित शर्मा २०१३ मध्ये झाला कर्णधार

रोहित शर्मा आधी डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. त्याला २०११मध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले. आयपीएल खेळत असलेल्या रोहित शर्माला पहिल्यांदाच २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या संधीचा लाभ घेत रोहित शर्माने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. याआधी सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह यांनी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. रोहितने मिळालेली जबाबदारी चोख पार पाडत टीमच्या टीमवर्कमध्ये सुधारणा व्हावी यावर भर दिला.

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील एक प्रबळ टीम

फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि टीमवर्क या सर्वच बाबतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी सुधारत आहे. याच कारणामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलमधील एक प्रबळ टीम झाली आहे. प्रत्येक आयपीएल स्पर्धेत संभाव्य विजेत्यांमध्ये सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सचे नाव आघाडीवर असते. चाहत्यांचा हा विश्वास सार्थ ठरवत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी