जाणून घ्या किती गंभीर आहे रोहित शर्माची दुखापत

Rohit Sharma Injured मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार रोहित शर्मा याच्या गुडघ्याच्या मागे असलेली नस दुखावली आहे. या दुखापतीमुळे रोहित चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या ४१व्या लीग मॅचमध्ये शारजात खेळला नाही.

Rohit Sharma
रोहित शर्मा (साभार - iplt20 वेबसाइट) 

थोडं पण कामाचं

  • मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत
  • गुडघ्याच्या मागे असलेली नस दुखावली
  • किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये झालेली दुखापत, चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये रोहितने घेतली विश्रांती

शारजा (Sharjah): मुंबई इंडियन्स (mumbai indians) टीमचा कर्णधार (captain) रोहित शर्मा (rohit sharma) याच्या गुडघ्याच्या मागे असलेली नस दुखावली (injury update) आहे. या दुखापतीमुळे रोहित चेन्नई सुपरकिंग्स (chennai super kings) विरुद्धच्या ४१व्या लीग मॅचमध्ये शारजात खेळला नाही. त्याने खुर्चीत बसून आराम करत मॅच बघितली. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या (ipl 2020) इतिहासात पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धची मॅच दहा विकेट राखून जिंकली. (mumbai indians captain rohit sharmas injury update)

टॉस जिंकून मुंबई इंडियन्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ९ बाद ११४ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने ११५ धावांचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून शानदार फलंदाजी केली आणि तेराव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूत विजय मिळवला. पोलार्डच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. उत्तम सांघिक कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्माची मैदानातील अनुपस्थिती जाणवली नाही. मात्र सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्येही रोहित शर्मा खेळला नाही तर निवड समितीच्या मनात रोहितच्या दुखापतीविषयी संशय निर्माण होण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड (New Zealand) दौरा सुरू असताना रोहितच्या पायाच्या पुढच्या भागातील नस दुखावली होती. या दुखापतीमुळे दौऱ्यात दीर्घ काळ रोहित बसून होता. नंतर कोरोनामुळे भारतासह जगभर दीर्घकाळ क्रिकेट ठप्प होते. सप्टेंबर महिन्यात आयपीएलच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या मॅच खेळलेल्या रोहित शर्माला किंग्स इलेव्हन पंजाब (kings XI punjab) विरुद्ध रविवारी मॅच सुरू असताना दुखापत झाली. या दुखापतीमुळे उर्वरित मॅचमध्ये रोहित शर्मा बसून होता. ही मॅच मुंबई इंडियन्स संघाने गमावली. नंतर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या मॅचमध्येही दुखापतीमुळे बसून होता. गुडघ्याच्या मागे असलेली नस दुखावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार तो विश्रांती घेत होता. पण राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित खेळला नाही तर त्याच्या दुखापतीबाबत संशय निर्माण होण्याची शक्यता आहे.

आयपीएल १० नोव्हेंबर रोजी संपेल. आयपीएल संपल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौऱ्यावर लगेच जाणार आहे. भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध २६ नोव्हेंबरला पहिली वन डे खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडण्याकरिता निवड समितीची बैठक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. ही बैठक होण्याआधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ही मॅच रविवारी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मॅचमध्ये रोहित खेळल्यास त्याच्या फिटनेसचा अंदाज येईल. पण रोहित खेळला नाही तर त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार करायचा की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण होईल. याआधी मागच्या वर्षी आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून फक्त एक मॅच खेळू शकला नव्हता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी