कोविड-19:  आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का 

IPL 2021
प्रशांत जाधव
Updated Apr 08, 2021 | 16:19 IST

Kiran More Corona positive:  आयपीएल 2021 सुरू होण्यास फक्त तीन दिवस राहिले असताना आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. किरण मोरे हे  महत्त्वाचे अधिकारी आहे आणि ते कोविड पॉझिटिव्ह असल्य

mumbai indians official and former wicket keeper kiran more tested positive for coronavirus
मुंबई इंडियन्सला धक्का    |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आयपीएल 2021 पूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का बसला
  • विकेटकीपिंग प्रशिक्षक आणि चॅम्पियन संघाचे प्रमुख अधिकारी किरण मोरे यांना कोरोनाची लागण झाली आहे
  • मुंबई इंडियन्सने दिली माहिती

Kiran More Corona positive:  मुंबई:  माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा टॅलेंट सर्च ऑफिसर किरण मोरे कोविड -१९ पॉझिटिव्ह झाले आहेत.  इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी ही माहिती दिली. मोरे ( 58 वर्षे) हा पाच सिझन आयपीएल चॅम्पियन संघाचे यष्टीरक्षक सल्लागार आहेत. (mumbai indians official and former wicket keeper kiran more tested positive for coronavirus)

मुंबई इंडियन्सने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “अजून काही लक्षणे दिसू आली नाहीत आणि त्यांना क्वारंटाइन ठेवले गेले आहे.” मुंबई इंडियन्स आणि किरण मोरे हे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आरोग्य मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करीत आहेत.

"मुंबई इंडियन्सची वैद्यकीय टीम मोरेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवेल आणि बीसीसीआयच्या नियमांचे पालन करेल." रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल बेंगळुरूच्या शिबिरात जाण्यापूर्वी कोविड -१९ पॉझिटिव्ह झाला होता.  देशात कोविड -१९ च्या संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. (mumbai indians official and former wicket keeper kiran more tested positive for coronavirus)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी