IPL 2022: मेगा लिलावात केलेल्या या चुकांचे परिणाम भोगतेय मुंबई इंडियन्स?

IPL 2022
Updated Apr 28, 2022 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai indians in ipl 2022: यावेळेस लीगच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे की एखाद्या संघाल सलग ८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. १५व्या हंगामात अतिशय निराशाजनक कामगिरीसह हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्ण बाहेर झाला आहे. 

rohit sharma
IPL 2022: मेगा लिलावातील चुकांचे परिणाम भोगतेय मुंबई? 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलमध्ये मुंबई एक असा संघ आहे जो आपल्या दमदार पुनरागमनसाठी ओळखला जातो.
  • आयपीएल २०२२साठी जेव्हा मेगा लिलाव सुरू होता. यादरम्यान मुंबईने अनेक खेळाडूंना आपल्या संघातून जाऊ दिले त्याचे परिणाम मुंबईला भोगावे लागत आहेत.
  • लिलावात संघाने ट्रेंट बोल्ट, क्विंटन डीकॉक, कृणाल पांड्या आणि राहुल चाहसारखे खेळाडू गमावले.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२२चा(ipl 2022) हंगाम पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी(mumbai indians) एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा काही वेगळा नाही. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग ८ सामन्यांमध्ये पराभवाचे पाणी प्यावे लागले. या लीगच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडले असेल की एखाद्या संघाला सलग ८ सामन्यांमध्ये पराभव मिळाला. १५व्या हंगामात निराशाजनक कामगिरीसह मुंबईचा संघ आता प्ले ऑफच्या शर्यतीतून(play off) बाहेर गेला आहे. अशातच आता उऱलेल्यया सामन्यांमध्ये खेळ सुधारण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. mumbai indians team poor performance due to mistakes in ipl mega auction

अधिक वाचा - इंडोनेशियाची पाम तेलाची निर्यात बंद, अदानी-रामदेवची दिवाळी

आयपीएलमध्ये मुंबई एक असा संघ आहे जो आपल्या दमदार पुनरागमनसाठी ओळखला जातो. दरम्यान, या हंगामात असे काहीच दिसले नाही. संघाने ना गोलंदाजी केली अथवा फलंदाजीमध्ये आपली ताकद दाखवली. अशातच काही कारणामुळे मुंबईला पराभवाचा हा फटका बसला आहे. 

मेगा लिलावात चुकीची रणनीती

आयपीएल २०२२साठी जेव्हा मेगा लिलाव सुरू होता. यादरम्यान मुंबईने अनेक खेळाडूंना आपल्या संघातून जाऊ दिले त्याचे परिणाम मुंबईला भोगावे लागत आहेत. लिलावात संघाने ट्रेंट बोल्ट, क्विंटन डीकॉक, कृणाल पांड्या आणि राहुल चाहसारखे खेळाडू गमावले. हे खेळाडू मुंबईला प्रत्येक क्षणी चांगली कामगिरी करत विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवतात. 

या लिलावात इशान किशन आणि जोफ्रा आर्चरला सोडून असाच एखाद्या खेळाडूमध्ये इंटरेस्ट दाखवला यावरूनही चर्चा झाली. इशानवर संघाने पैशांचा पाऊस बरसवला. मात्र सुरूवातीच्या दोन सामनयांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. याशिवाय टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यालाही रिटेन न करणे भारी पडत आहे. हार्दिक या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत असलेला हार्दिक जबरदस्त कामगिरी करत आहे. 

टॉप फलंदाजांचा फ्लॉप गेम

मुंबई इंडियन्सच्या संघात टी-२० फॉरमॅटसाठी अनेक जबरदस्त फलंदाज आहेत जे कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजीचे आक्रमण उद्ध्वस्त करू शकतात. मात्र या १५व्या हंगामात त्यांच्या बॅटमधून धावाच निघत नाही आहेत. कर्णधार रोहित शर्मा तर फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरलाय, रोहितने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात १९.१३च्या सरासरीने केवळ १५३ धावा केल्या आहेत. याशिवाय संघाचा ओपनर इशान किशननेही पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतके वगळात पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. इशानने ८ सामन्यांत २८.४३च्या सरासरीने १९९ धावा केल्यात. सूर्यकुमार यादवनेही काही खास कामगिरी केलेली नाही. त्याने ६ सामन्यांत केवळ २३९ धावा केल्यात. 

अधिक वाचा - रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला व्यावसायिकानं चिरडलं

वाईट गोलंदाजी

या हंगामात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज साफ अपयशी ठरले आहेत. जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाजही विकेट घेताना संघर्ष करताना दिसतोय, बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात केवळ ५ विकेट घेतल्या आहेत. बुमराहशिवाय मुंबईच्या संघाने बासिल थम्पी, रिले मॅड्रीथ, टायमल मिल्स, जयदेव उनादकट आणि मुरूगन अश्विनसारख्या गोलंदाजांनाही संधी दिली. मात्र हे खेळाडू त्या स्तराचा खेळ करू शकले नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी