चेन्नईच्या विजयानंतर पॉवर पोलार्डला ड्रेसिंग रुममध्ये मिळाली पॉवरफूल झप्पी, पहा व्हिडिओ

IPL 2021
भरत जाधव
Updated May 02, 2021 | 13:49 IST

अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) मध्ये झालेल्या आयपीएल (IPL) च्या २७व्या मॅचमध्ये कायरन पोलार्ड (Kieron Pollard) नावाचं वादळ आलं.

mumbai indians team warm welcome to kieron poliard
चेन्नईच्या विजयानंतर पॉवर पोलार्डचं जंगी स्वागत  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • तुफान खेळीतून पोलार्ड विरोधकांना दिलं उत्तर
  • ड्रेसिंग रुममध्ये जंगी स्वागत
  • सर्वात कमी चेंडूत केलं अर्धशतक

नवी दिल्ली: अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) मध्ये झालेल्या आयपीएल (IPL) च्या २७व्या मॅचमध्ये कायरन पोलार्ड (Kieron Pollard) नावाचं वादळ आलं. या वादळात चेन्नईच्या दमदार गोलंदाजाच्या हातातील चेंडू हा मैदानाबाहेरच राहिला. पोलार्डने या सामन्यात अवघ्या १७ चेंडूमध्ये आपलं अर्धशतक ठोकलं. कायरन पोलार्डने ३४ चेंडूंमध्ये नाबाद राहत ८७ धावा केल्या, यात ६ चौकार आणि ८ षटकार लगावले.

पोलार्डच्या या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने मॅच जिंकलीचं त्याशिवाय पोलार्ड परत एकदा मुंबईच्या चाहत्यांची मनेदेखील जिंकली. असा दमदार विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच स्वागतही त्याच पद्धतीने झालं. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून किरोन पोलार्डचा ड्रेसिंग रुममधील स्वागताचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच नेटीझन्सकजून पोलार्डच्या खेळीचं कौतुक होत आहे. यावेळी पोलार्डने टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर देताना म्हणाला की, अशा प्रकारच्या लोकांबद्दल लिखाण करणं थांबवा. जे आधी केलं तसचं करत रहा. कोण काय बोललं तरी हरकत नाही.'.

मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला कायरन पोलार्डचं स्वागत करताना प्रत्येकांकडून त्याला पॉवरफूल झप्पी (मिठी) मिळत होती. मुंबईने हा सामना ४ गडी राखून जिंकला. चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) सॅम करणने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तत्पूर्वी, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ४  गडी गमावत २१८ धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने नाबाद  ७२ धावा केल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने दोन विकेट घेतल्या.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी