मुंबई: आयपीएल २०२२मध्ये(ipl 2022) मुंबई इंडियन्सचा(mumbai indians) प्रवास खूपच निराशाजनक राहिला. संघाला यावेळेस पॉईंट टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, मुंबईला आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध विजय मिळाला होता. या सामन्यात मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू इशान किशनने(ishan kishan) चांगली कामगिरी केली होती. त्याने ४८ धावांची खेळी केली होती. या सामन्यात इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडियाही(Aditi Hundia) मैदानावर दिसली. mystry girl seen during mumbai indians vs delhi capitals match
अधिक वाचा - घरात या ५ वस्तू ठेवल्याने झपाट्याने वाढते धन-संपत्ती
मुंबईविरुद्ध दिल्लीच्या सामन्यादरम्यान इशान किशनची गर्लफ्रेंड दिसली होती. दरम्यान दोघांनी अद्याप आपल्या नात्याला दुजोरा दिलेला नाही. मात्र अनेकदा या दोघांना एकत्र पाहिले गेले. या दरम्यान आदिती आपल्या खास मैत्रीणीसह दिसली. यादरम्यान आदितीला चाहते मुंबईची लकी चार्म म्हणत होते. तर तिच्या मैत्रिणीबाबतही चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती.
आदिती हुंडिया एक फॅशन मॉडेल आहे. याशिवाय ती २०१७च्या मिस इंडिया स्पर्धची फायनलिस्ट राहिली आहे. तर २०१८मध्ये तीने सुपर नॅशनल इंडियाचा खिताबही आपल्या नावे केला आहे. या सामन्यात आदितीसह तिची मैत्रीण कशिका कपूर आहे. तीही एक मॉडेल आहे. यांचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलीये.
अधिक वाचा - फरहान अख्तरच्या मेहुणीचे बोल्ड फोटोशूट
या हंगामाबाबत बोलायचे झाल्यास तर इशानची कामगिरी या हंगामात काही खास राहिली नाही. त्याने या हंगामातील १४ सामन्यांत ४१८ धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन अर्धशतके ठोकली.