मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२म्ये मुंबई इंडियन्सची(mumbai indians) सुरूवात चांगली झाली नाही. पाच वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या चॅम्पियन टीमने सध्याच्या हंगामात आतापर्यंत आपले चारही सामने गमावले आहेत. या खराब सुरूवातीपासून मुंबई इंडियन्स १० संघांच्या पॉईंटटेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मने(rohit sharma) कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर म्हटले होते की ही पचवण्यालायक गोष्ट नाही. यातच मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे यात फ्रेंचायझीची मालकीण नीता अंबानी खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.
अधिक वाचा - ६ मुली पण पायांच्या फक्त ५ जोड्या, जाणून घ्या काय आहे सत्य
नीता अंबानी म्हणाल्या, मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे आणि विश्वास आहे की आपण नक्कीच पुढे जाऊ. आपण फक्त पुढे आणि वर जाणार आहोत. स्वत:चा स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. नीता पुढे म्हणाल्या, आपण याआधीही यातून गेलो आहोत आणि त्यानंतर पुढेत जात कप जिंकला. यासाठी मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही एकमेकांची साथ द्याल. जर तुम्ही एकमेकांसोबत आहात तर आपण यावर विजय मिळवू. तोपर्यंत तुम्हाला जे काही हवे आहे त्यासाठी माझा पाठिंबा आहे. एकमेकांवर विश्वास ठेवा. मुंबई इंडियन्स नेहमी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे.
𝐅𝐚𝐢𝐭𝐡 & 𝐛𝐞𝐥𝐢𝐞𝐟 💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2022
Mrs. Nita Ambani's message to the team after #RCBvMI.#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/CT6XmmvjL7
मुंबईने आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही २०१४मध्ये मुंबईने सुरूवातीचे पाच सामने गमावले होते. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये पंजाब किंग्सविरुद्ध पहिला विजय मिळवला होता. त्या हंगामात ते १४ अंकांसह ग्रुप स्टेजमध्ये चौथ्या स्थानावर राहिले होते.
अधिक वाचा - बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोप्या रांगोळीच्या डिझाइन्स
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१५मध्येही आपले पहिले चार सामने गमावले होते आणि फायनलमध्ये चेन्नईला हरवत ट्रॉफी जिंकली होती. मुंबई इंडियन्स आज मयांक अग्रवालच्या पंजाब किंग्शी दोन हात करत आहे.