तुमचा जॉब आहे सामना जिंकून देणे, फेअरवेल देणे नाही- गौतम गंभीर

IPL 2021
Updated Oct 08, 2021 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

डेविड वॉर्नरचा आयपीएलचा हा हंगाम चांगला राहिला नाही. त्याने एक कर्णधार म्हणून सुरूवात केली होती मात्र सातत्याच्या पराभवामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले.

david warner
तुमचा जॉब आहे सामना जिंकून देणे, फेअरवेल देणे नाही- गौतम गंभ 

थोडं पण कामाचं

  • सनरायजर्स हैदराबादचा दिग्गज क्रिकेटर डेविड वॉर्नरला फेअरवेल मॅच देण्याची गरज नाही
  • आपल्या शेवटच्या लीग सामन्यात सनरायजर्स हैदराबादला एखाद्या खेळाडूच्या फेअरवेलवर नव्हे तर  विजयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे
  • गेल्या दोन सामन्यांत डेविड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादची जर्सी घालून प्रेक्षकांच्या रांगेत बसून सामना पाहत होता.

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) म्हटले आहे की सनरायजर्स हैदराबादचा दिग्गज क्रिकेटर डेविड वॉर्नरला(David Warner)ला फेअरवेल मॅच देण्याची गरज नाही. त्याचे म्हणणे आहे की आपल्या शेवटच्या लीग सामन्यात सनरायजर्स हैदराबादला एखाद्या खेळाडूच्या फेअरवेलवर नव्हे तर  विजयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 

डेविड वॉर्नरचा आयपीएलचा हा हंगाम चांगला राहिला नाही. त्याने एक कर्णधार म्हणून सुरूवात केली होती मात्र सातत्याच्या पराभवामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्या जागी केन विल्यमसन्सला कर्णधार बनवण्यात आले. यानंतर वॉर्नरला प्लेईंग इलेव्हनमधूनही बाहेर टाकण्यात आले. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातच सनरायजर्स हैदराबादने २०१६मध्ये आयपीएलचा खिताब जिंकला होता. 

गेल्या दोन सामन्यांत डेविड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादची जर्सी घालून प्रेक्षकांच्या रांगेत बसून सामना पाहत होता. चाहत्यांचे म्हणणे आहे की त्याला फेअरवेल सामना मिळाला पाहिजे. कारण पुढील हंगामात तो सनरायजर्ससोबत खेळताना दिसू शकनात ही. 

फेअरवेलऐवजी हैदराबादला विजयावर लक्ष केंद्रित करायला हवे - गंभीर

दरम्यान, गौतम गंभीरला याबाबत काही वाटत नाही. त्याने म्हटले की सनरायजर्स हैदराबादसाठी फेअरवेलपेक्षा विजय महत्त्वाचा आहे. त्यांना विजयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. तो पुढे म्हणाला, अनेक महान खेळाडूंना फेअरवेल मिळत नाही. आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की सर्व दिग्गज खेळाडूंना त्याचा शेवटचा सामना मिळालेला नाही. मला ही फेअरवेल सिस्टीम समजतच नाही. तुम्ही सामना जिंकून देण्यासाठी खेळता. जर तो खेळाडू बेस्ट इलेव्हनमध्ये येतो तर निश्चितपणे त्याला खेळवावे. मात्र तो खेळाडू फिट बसत नसेल तर त्याला प्लेईंग ११मध्ये सामील करण्याची गरज नाही. सनरायजर्सचे काम विजय मिळवणे फेअरवेल देणे नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी