IPL 2022: फक्त ऑरेंज कॅपच नाही तर जोस बटलरने जिंकले आणखी ६ अवॉर्ड

IPL 2022
Updated May 30, 2022 | 12:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jos Buttler Awards । आयपीएल २०२२ चा किताब स्पर्धेत पहिल्याच वर्षी सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने पटकावला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या गुजरातच्या संघाने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ बळी राखून पराभव केला.

Not just the Orange Cap, but Jose Butler won six more awards
फक्त ऑरेंज कॅपच नाही तर जोस बटलरने जिंकले आणखी ६ अवॉर्ड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२ चा किताब गुजरात टायटन्सने जिंकला.
  • गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएलवर आपले नाव कोरले.
  • फक्त ऑरेंज कॅपच नाही तर जोस बटलरने जिंकले आणखी ६ अवॉर्ड

Jos Buttler Awards । अहमदाबाद : आयपीएल २०२२ चा किताब स्पर्धेत पहिल्याच वर्षी सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने पटकावला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या गुजरातच्या संघाने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ बळी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये रंगलेला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सॅमसनचा हा निर्णय चुकीचा ठरला. (Not just the Orange Cap, but Jose Butler won six more awards). 

अधिक वाचा : या कारणासाठी केली सिद्धू मूसेवालावर झाडल्या ३० गोळ्या

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सचा संघ २० षटकांत ९ बाद केवळ १३० धावा बनवू शकला. गुजरात टायटन्सच्या संघाने या आव्हानाला १८.१ षटकांत ७ गडी राखून पूर्ण केले. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज दोस बटलर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. तर युझवेंद्र चहलने पर्पल कॅप पटकावली आहे. 

अधिक वाचा : जाणून घ्या कोण होते पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला

ऑरेंज कॅपशिवाय बटलरला मिळाले ६ अवॉर्ड

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला ऑरेंज कॅपशिवाय आणखी ६ पुरस्कार मिळाले आहेत. जोस बटलरला सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकार मारल्याबद्दल १० लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. याशिवाय प्लेअर ऑफ द सीझन, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन असे पुरस्कार देण्यात आले आहेत. या सर्व पुरस्कारांसाठी जोस बटलरला १०-१० लाख रूपये मिळाले. ऑरेंज कॅप मिळाल्यानंतर जोस बटलर खूप भावूक झाला. तो म्हणाला की त्याला या हंगामात आपल्या संघासाठी विजेतेपद मिळवायचे होते, परंतु दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. 

जोस बटलरला मिळाले एकूण ६ अवॉर्ड

  1. ऑरेंज कॅप ( १० लाख रूपये आणि ट्रॉफी)
  2. सर्वाधिक षटकार (१० लाख रूपये आणि ट्रॉफी)
  3. सर्वाधिक चौकार (१० लाख रूपये आणि ट्रॉफी)
  4. प्लेअर ऑफ द सीझन (१० लाख रूपये आणि ट्रॉफी)
  5. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (१० लाख रूपये आणि ट्रॉफी)
  6. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन (१० लाख रूपये आणि ट्रॉफी)

बटलरने या हंगामात केल्या ८६३ धावा

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने या हंगामात सर्वाधिक ८६३ धावा केल्या. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचे दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. याआधी राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये विजेतेपद पटकावले होते. तेव्हा या संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी