IPL 2021, CSK vs MI: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामान

IPL 2021
Updated May 01, 2021 | 12:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

1st May, Delhi weather today, CSK vs MI pitch report, IPL 2021: आज आयपीएल 2021चा 27वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघांदरम्यान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे.

Arun Jaitley Stadium Pitch
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामान  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयपीएल 2021चा 27वा सामना मुंबई आणि चेन्नईदरम्यान रंगणार
  • रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीचे संघ आज आमनेसामने
  • दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये आज रंगणार सामना

नवी दिल्ली -  दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley stadium) आज आयपीएल 2021चा (IPL 2021) 27वा सामना (match) महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघांमध्ये होणार आहे. यामध्ये हे दोन उत्तम कर्णधार (captains) एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे पाचवेळा अजिंक्यपद (championship) पटकावणारा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात सफल असा मुंबईचा संघ आहे तर दुसरीकडे चेन्नईनेही तीनदा अजिंक्यपद पटकावले आहे. हा सामना नक्कीच रोमांचक (exciting) होणार आहे.

वाईट सुरुवातीनंतर चेन्नईच्या खेळात लक्षणीय सुधारणा

चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने आयपीएल 2021मध्ये वाईट सुरुवात केली, पण नंतर आपल्या खेळात त्यांनी लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत. 10 गुण आणि चांगल्या रनरेटसह ते गुणतालिकेत सर्वोच्च स्थानावर आहेत. तर विद्यमान जेते असलेल्या मुंबईच्या संघाने 6पैकी 3 सामने जिंकून 6 गुण पटकावले आहेत आणि गुणतालिकेत ते 4थ्या स्थानावर आहेत.

अरुण जेटली स्टेडियमची धावपट्टी आणि याआधीची धावसंख्या

आत्तापर्यंत दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये या मालिकेतील फक्त दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारे संघ विजयी झाले आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने सनरायजर्स हैदराबादच्या संघाचा 7 गडी राखून पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला होता. जाणून घ्या दिल्लीत झालेल्या दोन सामन्यांमधील धावसंख्या.

1. सनरायजर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स-  171/3, 173/3

2. राजस्थान रॉयल्स VS मुंबई इंडियन्स - 171/4, 172/3

जाणून घ्या आज कसे असेल दिल्लीतील हवामान

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आत्तापर्यंत आयपीएल 2021चे सामने कोणत्याही अडचणींपासून दूर राहिलेले आहेत. कोणत्याही सामन्यात पावसामुळे व्यत्यय आलेला नाही, मात्र आज असे होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यादरम्यान दिल्लीत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आजचा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. वातावरणात उष्णता राहणार आहे आणि संध्याकाळी दवामुळे खेळाडूंना चेंडू पकडताना त्रास होऊ शकतो. दिल्लीत आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी