IPL 2021, PBKS vs DC: पंजाब किंग्स आणि दिल्‍ली कॅपिटल्सच्या सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामान

IPL 2021
Updated May 02, 2021 | 12:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

2nd May, PBKS vs DC Pitch Report, IPL 2021, Ahmadabad weather today: आज आयपीएलच्या 14व्या मोसमातील 29वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांदरम्यान गुजरातमध्ये होणार आहे.

Narendra Modi stadium pitch
पंजाब किंग्स आणि दिल्‍ली कॅपिटल्सच्या सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामान  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • आयपीएलच्या 29व्या सामन्यात पंजाब आणि दिल्ली आमनेसामने
  • पंजाब आणि दिल्ली दोघांनी शेवटच्या सामन्यात मिळवला विजय
  • अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार सामना, खेळपट्टी महत्वाची

नवी दिल्ली :  आयपीएल 2021मधील (IPL 2021) 29वा सामना (match) पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघांदरम्यान आज अहमदाबादच्या (Ahmadabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium) खेळवला जाणार आहे. हे दोन्ही संघ सध्या उत्तम स्थितीत (good condition) आहेत, त्यामुळे हा सामना रोमांचक (exciting) ठरणार आहे. के. एल. राहुलच्या (K. L. Rahul) नेतृत्वातील पंजाब किंग्सने गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) संघाचा 34 धावांनी पराभव (defeat) केला होता तर रिषभ पंतच्या (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सनी (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) 7 गडी राखून मात दिली होती.

गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी दिल्ली तर पाचव्या स्थानी पंजाब

दिल्ली कॅपिटल्सचे या मोसमातील आत्तापर्यंतचे प्रदर्शन उत्तम आहे. दिल्लीने आत्तापर्यंत 7 सामने खेळले आहेत ज्यातील पाच सामन्यांमध्ये त्यांन विजय मिळवला आहे आणि आयपीएलच्या गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानी आहेत. तर पंजाब किंग्सने 7पैकी 3 सामने आपल्या नावावर केले आहेत आणि गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी आहेत. दिल्लीच्या संघाला हरवून गुणतालिकेतले आपले स्थान सुधारण्याची आणि प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्याची संधी पंजाबकडे आहे.

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात पंजाबचा केला होता पराभव

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या या मोसमात पंजाब किंग्सला पहिल्या सामन्यात धूळ चारली होती. पंजाबविरोधात दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून विजय नोंदवला होता, मात्र हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. पंजाबकडे एकूण आकड्यांचा फायदा असेल, कारण आयपीएलच्या इतिहासात दिल्लीविरुद्ध पंजाबचा रेकॉर्ड 15-12 असा आहे.

आज कसे राहणार अहमदाबादमधील हवामान?

अहमदाबादमध्ये सध्या खूप उष्णता आहे आणि इथले तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत असण्याचा अंदाज आहे. पावसाची शक्यता नाही, त्यामुळे ही उष्णता खेळाडूंसाठी परीक्षा घेणारी ठरू शकते. इथे 20 टक्क्यांपर्यंत आर्द्रता असेल. आत्तापर्यंत या मोसमात इथे झालेल्या सामन्यांमध्ये नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघांना दोनदा हार पत्करावी लागली आहे. ओलाव्यामुळे चेंडू ओला होऊन गोलंदाजांना चेंडूवर मनाजोगती पकड मिळाली नाही आणि यामुळे जलद गोलंदाजांपासून ते फिरकी गोलंदाजांपर्यंत सर्वांनाच अडचणी आल्या. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यालाच पसंती देईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी