IPL 2021, RR vs SRH: राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामान

IPL 2021
Updated May 02, 2021 | 13:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

2nd May, RR vs SRH pitch report, IPL 2021, Delhi weather today: आज आयपीएलच्या 14व्या मोसमातील 28वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादच्या संघांदरम्यान दिल्लीमध्ये होणार आहे.

Delhi stadiun pitch
राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामान  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयपीएल 2021मधील 28वा सामना आज म्हणजेच 2 मे रोजी
  • राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादचे संघ आमनेसामने
  • दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगणार सामना

नवी दिल्ली: आयपीएल 2021चा (IPL 2021) 28वा सामना (match) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) या दोन संघांमध्ये होणार आहे. या दोन्ही संघांची स्थिती सध्या वाईट (bad condition) आहे. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वातील राजस्थानला 6पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत तर हैदराबादला फक्त एक विजय मिळाला आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत (points table) आठ गुणांसह सातव्या स्थानी तर हैदराबाद सर्वात खालच्या जागेवर आहे. दिल्लीतील (Delhi) आजच्या सामन्यात हे दोन्ही संघ आपली लय परत आणण्याचा प्रयत्न करतील. हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने नुकताच संघाचा कर्णधारही (captain) बदलला आहे आणि डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) जागी केन विलियमसनला (Kane Williamson) कर्णधारपदाची धुरा दिली आहे.

कशी असणार दिल्लीची खेळपट्टी?

सध्याच्या मोसमात अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएलचे फक्त तीन सामने झाले आहेत ज्यांमध्ये फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये दिल्लीला 175 धावांचा पल्लाही गाठता आला नाही तर तिसऱ्या सामन्यात फलंदाजीची दिवाळी पाहायला मिळाली. या तीन्ही सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांचाच विजय झाला. त्यामुळे या सामन्यात पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडू शकतो. इथे या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामने खेळले आहेत आणि इथल्या परिस्थितीशी ते परिचित आहेत.

दिल्लीतील सामन्यांमधील आत्तापर्यंतची धावसंख्या

1. सनरायजर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स- 171/3, 173/3

2. राजस्थान रॉयल्स VS मुंबई इंडियन्स- 171/4, 172/3

3. चेन्नई सुपर किंग्स VS मुंबई इंडियन्स- 218/4, 219/6

कसे राहणार दिल्लीचे हवामान?

दिल्लीत गरमी वाढत आहे. रविवारी कडक ऊन असण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि हैदराबादचे संघ जेव्हा दुपारी साडेतीन वाजता मैदानात उतरतील तेव्हा दोन्ही संघांना गरमीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजीला प्राधान्य देईल जेणेकरून खेळाडू थकणार नाहीत. आर्द्रता 29 टक्के असणार आहे. तर 10 ते 15 किलोमीटर प्रतितास या दराने वारा आणि हलके मळभ असणार आहे. दिल्लीत रविवारी कमाल तापमान 38 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी