Predicted Playing 11, MI vs SRH, Match-9: मुंबई आणि हैदराबाद आमनेसामने

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 17, 2021 | 17:42 IST

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, Dream 11: मुंबई इंडियन्स और सनरायजर्स हैदराबाद यांच्यात शनिवार १७ एप्रिल २०२१ रोजी आयपीएलची नववी लीग मॅच होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्‍टेडियमवर ही मॅच होईल.

playing 11 prediction dream team ipl 2021 mumbai indians vs sunrisers hyderabad chennai ma chidambaram stadium
IPL 2021 Match 9 मुंबई वि. हैदराबाद 

थोडं पण कामाचं

  • Predicted Playing 11, MI vs SRH, Match-9: मुंबई आणि हैदराबाद आमनेसामने
  • चेन्नईच्या एमए चिदंबरम स्‍टेडियमवर होईल मॅच
  • आयपीएलची नववी लीग मॅच

चेन्नई: डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदराबाद आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये शनिवार १७ एप्रिल २०२१ रोजी आयपीएलची नववी लीग मॅच होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्‍टेडियमवर ही मॅच होईल. सनरायजर्स हैदराबाद यंदाच्या आयपीएलमधील त्यांचा पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. 

याआधी सनरायजर्स हैदराबाद संघाचा त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये केकेआरने पराभव केला. ही मॅच सनरायजर्स हैदराबाद दहा धावांनी हरली. नंतर आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये त्यांचा सहा धावांनी पराभव झाला. याउलट मुंबई इंडियन्स संघाचा त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये आरसीबीने पराभव केला. पण केकेआर विरुद्धची मॅच मुंबई इंडियन्सने दहा धावांनी जिंकली. 

सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आयपीएल २०२१ मध्ये एमए चिदंबरम स्‍टेडियमवर आधी खेळले आहेत. दोन्ही संघांना मैदानाचा अंदाज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादला एमए चिदंबरम स्‍टेडियमवर अद्याप पहिला विजय मिळवता आलेला नाही. 

एमए चिदंबरम स्‍टेडियमवर मोठी धावसंख्या उभारणे कठीण आहे. यामुळे धावांच्या जोरावर नाही तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जिंकण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद संघाला घाम गाळावा लागेल. तर मुंबई इंडियन्स संघाला आणखी एक विजय मिळवून आयपीएलमधील आपली घोडदौड आणखी वेगवान करण्याची संधी आहे. तज्ज्ञांच्या मते १४० किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्या एमए चिदंबरम स्‍टेडियमवर पाठलाग करण्यासाठी कठीण आहे. 

मॅचसाठी अंतिम संघ या खेळाडूंमधून निवडणार - 

सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, जेसन रॉय, मनीष पांडे, विराट सिंग, प्रियांम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, विजय शंकर , मोहम्मद नबी, रशीद खान, जॉनी बेअरस्टो, वृध्दिमान साहा, श्रीवत गोस्वामी, बासिल थंपी, जेसन होल्डर, जगदेश सुचित, केदार यादव, मुजीब उर रहमान

मुंबई इंडियन्स :  रोहित शर्मा (कर्णधार), अदित्य तारे, अनमोलप्रित सिंग, अनकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रित बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, मोहसिन खान, सौरभ तिवारी, ट्रेंट बाउल्ट, अ‍ॅडम मिलने, नॅथन कॉल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशान, युधवीर चरक, मार्को जेन्सेन, अर्जुन तेंडुलकर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी