RR vs MI Playing 11, Dream11 Prediction | मुंबई : सध्या आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू आहे. मात्र आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचा हंगाम एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण मुंबई इंडियन्सला या हंगामात अद्याप विजयाचे खाते खोलता आले नाही. दरम्यान राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये आज आयपीएल २०२२ मधील ४४ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डि वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ७ वाजता पार पडेल. (Playing XI of Rajasthan Royals and Mumbai Indians could be like this).
अधिक वाचा : अडीच वर्षे कुंभ राशीत शनि करणार संक्रमण, वाचा सविस्तर
दरम्यान, आजच्या सामन्या मुंबईचा संघ आपल्या विजयाचे खाते उघडण्याचे निर्धाराने उतरेल. मुंबईच्या संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत त्यातील एकाही सामन्यात त्यांना विजय मिळाला नाही. तर राजस्थान रॉयल्सच्या संघाने आतापर्यंत ८ सामन्यांत ६ विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तळाशी असून आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सचा संघ आजचा देखील सामना जिंकून आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल.
अधिक वाचा : के.एल राहुल आणि अथिया शेट्टी होणार रणबीर आलियाचे शेजारी
मुंबई इंडियन्सच्या संघाला या हंगामानंतर अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. ईशान किशनला खर्च केलेला भरघोस पैसा हा निर्णय योग्य होता? टीम डेव्हिडला बाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य होता का? जोफ्रा आर्चरवर पैसे खर्च करण्याचा निर्णय योग्य होता का? कायरन पोलार्डची खराब कामगिरी असताना देखील त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय योग्य होता? रोहित शर्माचा अचानक फॉर्म कसा गायब झाला? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मुंबई इंडियन्सना द्यायची आहेत.
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यांच्याकडे अनेक कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलू शकतात असे खेळाडू आहेत. राजस्थान रॉयल्सचे टॉप-४ मध्ये स्थान निश्चित झाले आहे, त्यामुळे कदाचित ते त्यांचा मुख्य गोलंदाज ट्रेंट बोल्टला विश्रांती देऊ शकतील. तर डॅरिल मिशेलच्या जागी करुण नायरचे पुनरागमन शक्य आहे. नवदीप सैनीला संधी मिळणार की नाही हे पाहण्याजोगे असेल.
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डेनियल सेम्स, जयदेव उनादकट, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह आणि रायली मेरेडिथ.
राजस्थान रॉयल्स - जोल बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, करूण नायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जिमी नीशम, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन.