सामन्यानंतर पृथ्वी शॉने केला खुलासा, या कारणामुळे शिवम मावीच्या एका षटकात ठोकले 6 चौकार

Prithvi Shaw six 4's in 1 over: दिल्ली कॅपिटल्सचा युवा भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉने गुरुवारी आयपीएल 2021च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शिवम मावीच्या एका षटकात 6 चौकार मारले होते.

Prithvi Shaw and Shivam Mavi
सामन्यानंतर पृथ्वी शॉने केला खुलासा, या कारणामुळे शिवम मावीच्या एका षटकात ठोकले 6 चौकार 

थोडं पण कामाचं

  • दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून विजय
  • सामनावीर पृथ्वी शॉने सांगितले की कसे एका षटकात सहज मारले 6 चौकार
  • पृथ्वीने शिवम मावीच्या एका षटकात मारले शानदार सहा चौकार

Prithvi Shaw six 4's in 1 over : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) युवा सलामीवीर (young opener) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) एक उत्तम फलंदाज (good batsman) आहे यात काहीच शंका नाही. गेल्या एक दोन वर्षात तो अनेकदा चांगले प्रदर्शन (good performance) करताना दिसला आणि स्थानिक क्रिकेटमध्ये (local cricket) अनेक उत्तम खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा त्याने आपली लय पकडली आणि गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (Kolkata Knight Riders) सामन्यात पुन्हा एकदा आपल्या बॅटची कमाल दाखवली. त्याने फक्त 18 चेंडूंमध्ये अर्धशतक (half century) ठोकले आणि शिवम मावीच्या (Shivam Mavi) एका षटकात (over) 6 चौकार (boundaries) फटकावले.

41 धावांमध्ये पृथ्वी शॉने काढल्या धमाकेदार 82 धावा

पृथ्वी शॉने कोलकाता नाईट राइडर्सविरुद्ध 41 चेडूंमध्ये 82 धावा काढून दिल्ली कॅपिटल्सला 7 गडी राखून विजय मिळवून दिला. तीन षट्कार आणि 11 चौकारांसह दमदार खेळी करणाऱ्या सलामीवीर पृथ्वी शॉने सांगितले की तो धावांचा विचार न करता स्वाभाविकरित्या खेळत होता. याशिवाय त्याने हेही सांगितले की कसे त्याने शिवम मावीच्या गोलंदाजीवर 6 चेंडूंमध्ये 6 चौकार ठोकले.

शिवमच्या गोलंदाजीचा अंदाज असल्याने लगावले 6 चौकार

शिवम मावीच्या एका षटकात सहा चौकार कसे मारले या प्रश्नावर पृथ्वी शॉने सांगितले की यादरम्यान त्याला जास्त विचार करावा लागला नाही, कारण हे दोघेजण 4-5 वर्षे ज्यूनियर क्रिकेट एकत्र खेळले आहेत आणि शिवम कशी गोलंदाजी करतो हे पृथ्वीला चांगलेच माहिती आहे. सामन्यानंतर पृथ्वी शॉ म्हणाला, ‘‘मी काहीच विचार करत नव्हतो. फक्त ढिल्या चेंडूंची वाट पाहात होतो. मला ठाऊक होते की शिवम कुठे चेंडू टाकेल, कारण ज्यूनियर स्तरावर आम्ही 4-5 वर्षे एकत्र क्रिकेट खेळलो आहोत.’’

फॉर्ममध्ये असताना धावांचा विचार करत नाही- पृथ्वी

पृथ्वी पुढे म्हणाला, ‘‘जेव्हा मला वाटते की मी फॉर्ममध्ये आहे तेव्हा मी धावांचा विचार करत नाही. मी माझ्याबद्दलही विचार करत नाही, उद्देश हा फक्त संघाला जिंकून देण्याचा असतो.’’ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या पृथ्वी शॉने सांगितले की त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की स्वतःचा नैसर्गिक खेळ करत राहा. त्याने खूप मेहनत घेतली आणि क्रिकेटमध्ये उतारचढाव तर येतच असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी