PBKS vs RCB: राहुल चमकला; पंजाब जिंकले, बंगळुरू हरले

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated May 01, 2021 | 06:35 IST

केएल राहुलच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २६व्या लीग मॅचमध्ये पंजाब किंग्सने विजय मिळवला.

Punjab Kings beat Royal Challengers Bangalore by 34 runs
PBKS vs RCB: राहुल चमकला; पंजाब जिंकले, बंगळुरू हरले 

थोडं पण कामाचं

  • PBKS vs RCB: राहुल चमकला; पंजाब जिंकले, बंगळुरू हरले
  • केएल राहुलच्या नाबाद ९१ धावा
  • पंजाबने मॅच ३४ धावांनी जिंकली

अहमदाबाद : केएल राहुलच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २६व्या लीग मॅचमध्ये पंजाब किंग्सने विजय मिळवला. पंजाबने मॅच ३४ धावांनी जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा बंगळुरूचा निर्णय चुकला. पंजाब किंग्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १७९ धावा केल्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २० ओव्हरमध्ये ८ बाद १४५ धावा एवढीच मजल मारता आली. Punjab Kings beat Royal Challengers Bangalore by 34 runs

पंजाब किंग्स संघाकडून प्रभसिमरन सिंह (७ धावा), क्रिस गेल (४६ धावा), निकोलस पूरन (शून्य धावा), दीपक हुड्डा (५ धावा), शाहरुख खान (शून्य धावा), केएल राहुल (नाबाद ९१ धावा), हरप्रीत बराड (नाबाद २५ धावा) यांनी योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून केल जेमिनसनने दोन तर शाहबाझ अहमद, डॅनिअल सॅम्स आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून देवदत्त पडिक्कल (७ धावा), विराट कोहली (३५ धावा), ग्लेन मॅक्सवेल (शून्य धावा), एबी डीविलिअर्स (३ धावा), रजत पाटीदार (३१ धावा), शाहबाझ अहमद (८ धावा), डॅनिअल सॅम्स (३ धावा), हर्षल पटेल (३१ धावा), केल जेमिनसन (नाबाद १६ धावा), मोहम्मद सिराज (नाबाद शून्य धावा) यांनी योगदान दिले. पंजाब किंग्स संघाकडून हरप्रीत ब्रारने ३ तर रवि बिश्नोईने २ विकेट घेतल्या. मोहम्मद शामी, ख्रिस जॉर्डन आणि रिले मेरेडिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी