लोकेश राहुलचा हा रेकॉर्ड तुम्हालाही करेल हैराण, म्हणाल – सुधर रे राहुल

IPL 2021
Updated Apr 19, 2021 | 15:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सची सुरूवात चांगली झाली होती.

lokesh rahul
लोकेश राहुलचा हा रेकॉर्ड तुम्हालाही करेल हैराण 

थोडं पण कामाचं

  • पंजाबचा कर्णधार राहुलने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक ठोकले.
  • आयपीएल २०२० पासून आतापर्यंत सलामीला फलंदाजी करणाऱ्या राहुलने १३०च्या स्ट्राई रेटने आपल्या डावात तीन वेळा ५० अथवा त्याहून अधिक चेंडू खेळणारा लोकेश एकमेव फलंदाज आहे.
  • २०१८च्या हंगामात राहुल तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीग (IPL 2021) मध्येही पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुलची (KL Rahul) बॅट चांगलीच तळपतआहे. पंजाब किंग्सने काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals)  लढत गिली. राहुलने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शानदार ६१ धावांची खेळी केली. या अर्धशतकासह राहुलने आयपीएलमधील एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. गेल्या हंगामातील फॉर्म त्याने या हंगामातही कायम राखला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात ५०हून अधिक धावांची खेळी केली आहे.

आयपीएल २०२० पासून आतापर्यंत सलामीला फलंदाजी करणाऱ्या राहुलने १३०च्या स्ट्राई रेटने आपल्या डावात तीन वेळा ५० अथवा त्याहून अधिक चेंडू खेळणारा लोकेश एकमेव फलंदाज आहे. दरम्यान, २०१८मध्ये पंजाबच्या फ्रेंचायझीशी जोडले गेल्यानंतर लोकेश राहुलने प्रत्येक सीझनमध्ये ५००हून अधिक धावा केल्या. मात्र हा आकडा सांगतात की पहिल्यांदा फलंदाजी करताना राहुल किती स्लो आहे. कालच्या सामन्यातही हे पाहायला मिळाले.

५० धावा ठोकल्या, मात्र स्लो रनरे

पंजाबचा कर्णधार राहुलने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक ठोकले. राहुलने ४५ चेंडूत अर्धशतक ठोकले. राहुलचे टी-२० लीगमधील हे २३वे अर्धशतक आहे. राहुलने काही चांगले शॉट घेतले. मात्र त्याचा डाव खूप धीमा होता. या हंगामात राहुलने तीन सामन्यात मिळून १५७ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचे सलामीवीर राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी १२२ धावा केल्या.

मिळाले दोनदा जीवनदान

लोकेश राहुलला या डावात दोनवेळा जीवदान मिळाले. दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मेरिवालाच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने राहुलचा कॅच सोडला. १५व्या ओव्हरमध्ये मार्क्स स्टोइनिसने आवेश खानच्या चेंडूवर राहुलचा कॅच सोडला.

२०१८च्या हंगामात राहुल तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने ५४.९१च्या सरासरीने आणि १५८.४१च्या स्ट्राईक रेटने ६५९ धावा केल्या होत्या. त्या हंगामात ६५९ धावा केल्या होत्या. त्यात त्याने ६ अर्धशतक ठोकले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी