पंजाबचा ६ विकेट राखून विजय

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Oct 07, 2021 | 23:28 IST

चेन्नई विरुद्धची मॅच पंजाब किंग्सने सहा विकेट राखून जिंकली.

Punjab Kings won by 6 wkts against Chennai Super Kings
पंजाबचा ६ विकेट राखून विजय 

थोडं पण कामाचं

  • पंजाबचा ६ विकेट राखून विजय
  • पंजाबचा कॅप्टन केएल राहुल याने ४२ बॉलमध्ये सात फोर आणि आठ सिक्स मारत नाबाद ९८ धावा केल्या
  • केएल राहुल मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी

दुबईः टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पंजाब किंग्सने चेन्नई सुपरकिंग्सला वीस ओव्हरमध्ये सहा बाद १३४ या धावसंख्येवर थोपवले. धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबने फक्त तेरा ओव्हर खेळून आणि चार विकेट गमावून १३९ धावा केल्या. चेन्नई विरुद्धची मॅच पंजाब किंग्सने सहा विकेट राखून जिंकली. पंजाबचा कॅप्टन केएल राहुल याने ४२ बॉलमध्ये सात फोर आणि आठ सिक्स मारत नाबाद ९८ धावा केल्या. या तुफान फलंदाजीमुळे तो मॅन ऑफ द मॅच झाला. Punjab Kings won by 6 wkts against Chennai Super Kings

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने १२, फाफ डू प्लेसिसने ७६, मोईन अलीने शून्य, रॉबिन उथप्पाने २, अंबाती रायुडूने ४, महेंद्रसिंह धोनीने १२, रविंद्र जडेजाने नाबाद १५ आणि डी जे ब्राव्होने नाबाद ४ धावा केल्या. पंजाबकडून ख्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी २ तर मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी १ विकेट घेतली. 

नंतर फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबकडून कॅप्टन केएल राहुल याने नाबाद ९८ धावा केल्या. मयंक अग्रवालने १२, सरफराझ खानने शून्य, शाहरूख खानने ८, अॅडन मार्करामने १३ आणि मोइसेस हेनरिक्सने नाबाद ३ धावा केल्या. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने ३ तर दीपक चहरने १ विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी