IPL 2022: मैं झुकेगा नहीं... वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूवरही पुष्पा फिव्हर, विकेट घेतल्यानंतर केले असे सेलिब्रेशन

IPL 2022
Updated Apr 19, 2022 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022, KKR Vs RR: आता आयपीएलच्या सामन्यांवरही पुष्पाचा फिव्हर चढलेला दिसत आहे ओबेड मॅकॉयनेही विकेट घेतल्यानंतर ढासू अंदाजात सेलिब्रेशन केले. 

obey mccod
IPLमैं झुकेगा नहीं...विंडिजच्या क्रिकेटपटूवरही पुष्पा फिव्हर 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलचा ३०वा सामना केकेआर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. 
  • कॅरेबियन खेळाडू ओबेड मॅकॉयचा वेगळाच अंदाज
  • विकेट घेतल्यानंतर पुष्पा स्टाईलमध्ये केले सेलिब्रेशन

मुंबई: दाक्षिणात्य सिनेमा पुष्पाची(pushpa) क्रेझ अद्याप लोकांमध्ये कायम आहे. सिनेमाचे डायलॉग तसेच गाण्यावर अजूनही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनत आहेत. इतकंच नव्हे तर सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सारेच या गाण्याचे चाहते आहेत. तसेच या सिनेमातील सीन्सची नक्कल करत आहेत. आता आयपीएलमध्येही(ipl) एका खेळाडूने विकेट(wicket) घेतल्यानंतर पुष्पा स्टाईलमध्ये(celebration in pushpa style) सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना या खेळाडूची ही स्टाईल खूपच आवडलीये. याचे व्हिडिओ, फोटोज चांगलेच व्हायरल होत आहेत. pushpa fever on carebian cricketer obed mccoy in ipl 2022

अधिक वाचा - तरुणाला जमिनीवर घासायला लावले नाक, तरुणाची आत्महत्या

खरंतर, सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ३०वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कॅरेबियन खेळाडू ओबेड मॅकॉयलाही राजस्थानच्या संघाने संधी दिली. पहिलाच सामना खेळणाऱ्या ओबेड मॅकॉयने चांगली कामगिरी केली. अखेरच्या ओव्हरमध्ये मॅकॉयने अशी कमाल केली ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्याने अखेरच्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेत दोन बॉल आधीच केकेआरचा डाव संपवला. इतकंच नव्हे तर मॅकॉयने पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशनही केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर लोकही त्याच्यावर मीम्स बनवत असून त्याला पुष्पा भाऊ म्हणत आहेत. 

अखेरच्या ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी ११ धावा हव्या होत्या. मात्र मॅकॉयने शानदार गोलंदाजी राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. कारण एक वेळेस असे वाटत होते की राजस्थानच्या हातून सामना निसटतोय की काय. मात्र मॅकॉयची जादू चालली आणि संपूर्ण बाजी पलटली. 

अधिक वाचा - या जन्मतारखेची लोक जन्मतः नशीबवान असतात, वाचा सविस्तर

श्रेयस अय्यरची खेळी अपयशी

या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने जबरदस्त खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजयी करू शकली नाही. श्रेयस अय्यरने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ५१ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी