मुंबई: टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) भारताचा सफल गोलंदाजांपैकी(bowler) एक आहे. आर अश्विन केवळ कसोटी क्रिकेटमध्येच नव्हे तर व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही फलंदाजांना खूप त्रस्त करतो. यावेळेस अश्विन आयपीएलमध्ये (ipl 2022)राजस्थान रॉयल्स(rajasthan royals) संघाचा भाग आहे. अश्विनने मंगळवारी आरसीबीविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात अश्विनने खास रेकॉर्ड केले. अश्विनसाठी हा सामना अविस्मरणीय ठरला. R. Ashwin creates history in ipl 2022
अधिक वाचा-
आर. अश्विनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध ४ ओव्हरमध्ये ४.२५च्या इकॉनॉमीने १७ धावा देत ३ विकेट मिळवल्या. अश्विनने रजत पाटीदार, शाहबाज अहमद आणि सुयश प्रभूदेसाईला बाद केले. यासोबतच आता टी-२० क्रिकेटमध्ये अश्विनने २७१ विकेट घेतल्या आहेत. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने याबाती पियुष चावलाल मागे टाकले. पियुष चावलाच्या नावावर २७० टी-२० विकेट आहेत.
आर अश्विनने या सामन्यात दिग्गज स्पिनर हरभजन सिंहचाही एक रेकॉर्ड तोडला आहे. आता आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो ऑफ स्पिनर बनला आहे. अश्विनच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण १५२ विकेट आहेत. त्याने हरभनजन सिंगचा १५० विकेटचा रेकॉर्ड तोडला. आर अश्विन आयपीएलमध्ये १५० हून अधिक विकेट घेणारा सहावा गोलंदाज ठरला आहे.
अधिक वाचा - या जन्मतारखेच्या मुली आपल्या वडिलांसाठी असतात नशीबवान
गोलंदाज विकेट
अमित मिश्रा १६६ विकेट
पियुष चावला १५७ विकेट
युझवेंद्र चहल १५७ विकेट
भुवनेश्वर कुमार १५१ विकेट
हरभजन सिंह १५० विकेट
आर अश्विन १५२ विकेट