IPL 2022: राहुल त्रिपाठीचा हैराणजनक कॅच, मात्र काही तासांत भेटला झटका

IPL 2022
Updated Apr 12, 2022 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Best catch of IPL 2022, Rahul Tripathi grabs a stunner: गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने सोमवारी हैदराबादविरुद्ध खेळताना एक जबरदस्त शॉट खेळला मात्र त्यावर सनरायजर्स हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने जो कॅच घेतला त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. 

rahul tripathi
IPL 2022त्रिपाठीचा हैराणजनक कॅच, मात्र काही तासांत बसला झटका  
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२: सनरायजर्स हैदराबादने गुजरात टायटन्सला दिली मात
  • सामन्यादरम्यान राहुल त्रिपाठीने घेतला हैराणजनक कॅच
  • शुभमन गिलचा कॅच घेतला मात्र दुखापतग्रस्त झाला

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादाने गुजरात टायटन्सला ८ विकेटनी मात दिली. सामन्यात गुजरात टायटन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेला सनरायजर्स हैदराबादचा संघाने हे आव्हाव १९.१ ओव्हरमध्ये २ विकेट गमावत पूर्ण केले. या दरम्यान सनरायजर्स हैदराबादचा एक खेळाडू सातत्याने चर्चेत राहिला. हा खेळाडू म्हणजे राहुल त्रिपाठी. त्याने फिल्डिंगदरम्यान कमाल केली आणि त्यानंतर फलंदाजीदरम्यानही चर्चेत आला. 

अधिक वाचा - रिझर्व्ह बॅंकेने महाराष्ट्रातील 4 सहकारी बँकांना ठोठावला दंड

सनरायजर्स हैदराबादकडून आयपीएल २०२२च्या लिलावात खऱेदी करण्यात आलेल्या सर्वात महागड्या अनकॅप्ड राहुल त्रिपाठीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा होती. तो एक चांगला फलंदाज असण्यासोबतच जबरदस्त फिल्डरही आहेय सोमवारी गुजरात टायट्सविरुद्ध त्याची एक झलक पाहायला मिलाली. 

हे प्रकरण गुजरातच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमधील आहे. यावेळेस गुजरातचा युवा भारताचा सलामीवीर शुभमन गिल ८ बॉलमध्ये ७ धावा कर धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा भुवनेश्वर कुमारच्या या ओव्हरमधील एका बॉलवर शुभमन गिलने कव्हर्सच्या दिशेने जोरदार शॉट खेळला. बॉल पूर्ण वेगाने हवेत उडत होता. त्यामुळे बाऊंड्री होणार हे नक्की होते. मात्र तेव्हा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या राहुल त्रिपाठीने शानदार डाईव्ह लगावताना एका हाताने कॅच पकडला. 

हा पाहा राहुल त्रिपाठीचा कॅच


फलंदाजीदरम्यान रिटायर्ड हर्ट झाला राहुल त्रिपाठी

राहुल त्रिपाठीने जो शुभमन गिलचा जो कॅच पकडला तो नक्कीच कोणी विसणार नाही. मात्र सामन्यानंतर पुन्हा राहुल त्रिपाठी चर्चेचा विषय ठरला. जेव्हा त्रिपाठी फलंदाजी करण्यासाठी उतरला तेव्हा तो आणि कर्णधार केन विल्यमसन्स आपल्या संघाला वेगाने विजयाच्या दिशेने नेत होते. तेव्हा १४व्या ओव्हरमध्ये शानदार षटकार ठोकतच राहुल त्रिपाठी  दुखापतग्रस्त होत पिचवर पडला. 

अधिक वाचा - अदानीच्या या 3 कंपन्यांच्या शेअर्सची धूम...शेअर्सवर उड्या

मैदानावर फिजिओ झाल्यानंतर राहुलची तपासणी केली तेव्हा त्याच्या पायाचे स्नायू खेचले गेले होते. त्याला षटकार ठोकताना खूप दुखणे वाढल. यामुळे चांगला खेळत असलेला डाव त्याला मध्येच सोडावा लागला. तो रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी निकोलस पूरन उतरला त्याने १८ बॉलमध्ये नाबाद ३४ धआवांची खेळी करत हैदराबादला विजय मिळवून दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी