Playing 11 MI vs RR, IPL 2021, 29 April: राजस्थानसमोर आज मुंबईचे आव्हान, पाहा कसे असणार प्लेईंग ११

IPL 2021
Updated Apr 29, 2021 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Indians vs Rajasthan Royals, Dream 11: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज आयपीएल २०२१मधील २४ वा सामना रंगत आहे. या सामन्यात प्लेईंग ११ कोण असणार आहे यावर साऱ्यांची नजर आहे. 

mumbai vs rajasthan
राजस्थानसमोर आज मुंबईचे आव्हान, पाहा कसे असणार प्लेईंग ११ 

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२१मध्ये २४व्या सामन्यात मुंबई आणि राजस्थान यांच्यात टक्कर
  • अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार सामना
  • या सामन्यासाठी कोण असणार प्लेईंग ११

मुंबई: गतविजेत्या मुंबईची(mumbai indians) गाठ आज आयपीएल २०२१(ipl 2021)मधील २४व्या सामन्यात राजस्थानशी(rajasthan royals) पडणार आहे. अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत.त्यात दोन सामन्यात विजय मिळवला. चांगल्या रनरेटमुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे तर संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणारी राजस्थान रॉयल्स हा संघ सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात पंजाब किंग्सकडून तब्बल ९ विकेटनी पराभूत व्हावे लागले होते. तर राजस्थान रॉयल्ने आपल्या गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला ६ विकेटनी हरवले होते. 

दोन्ही संघांसाठी हे मैदान नवे असणार आहे. त्यामुळे दोनन्ही संघ काय रणनीती आखणार तसेच कोणत्या ११ खेळाडूंवर विश्वास टाकला जाईल हे पाहावे लागेल. मुंबई इंडियन्ससाठी सध्या मिडल ऑर्डर त्रासदायक ठरत आहे. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि किरेन पोलार्ड यांना अद्याप सूर गवसलेला नाही. याशिवाय संघाला चिंता आहे ती सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या कामगिरीत सातत्य नाही त्याची. सूर्यकुमार यादवने तरी अर्धशतक ठोकलेहोते. मात्र इशान किशन अद्याप छाप सोडू शकलेला नाही. 

रोहित शर्मा फॉर्ममध्ये आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्सचा संघ आपल्या टॉप ऑर्डरमुळे त्रस्त आहे. जोस बटलर फॉर्ममध्ये नाही. संजू सॅमसनच्या कामगिरीत सातत्य नाही. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यांसाठी प्लेईंग ११ निवडणे कठीण होणार आहे. 

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे आक्रमण चांगले आहे. त्यांनी मु्ख्य सामन्यांत स्वत:ला सिद्ध केले आहे. तर राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज लाई आणि लेन्थवर बॉल टाकत आहे. मात्र नेमक्या संधीच्या वेळेस चमकत नाहीत. रोहित शर्मा आपल्या संघाला विजयी पथावर आणण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्यासाठी सर्वच खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. 

मुंबई इंडियंस चा संभाव्य संघ (Mumbai Indians Probable Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्‍ट।

राजस्‍थान रॉयल्‍सचा संभाव्य संघ (Rajasthan Royals Probable Playing XI): जोस बटलर, यशस्‍वी जायसवाल, संजू सैमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, डेविड मिलर, राहुल तेवतिया, रियान पराग, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, मुस्‍ताफिजुर रहमान।

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी