मिलरमुळे राजस्थानने साकारला विजय

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2021 | 02:14 IST

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या आयपीएलच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा विजय झाला.

Rajasthan Royals beat Delhi Capitals by 3 wickets
मिलरमुळे राजस्थानने साकारला विजय 

थोडं पण कामाचं

  • मिलरमुळे राजस्थानने साकारला विजय
  • डेव्हिड मिलरच्या तुफानी खेळीने राजस्थानचचा विजय
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या आयपीएलच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा विजय

मुंबईः दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या आयपीएलच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा विजय झाला. अखेरच्या ओव्हरमध्ये राजस्थानने विजय साकारला. राजस्थान रॉयल्सने मॅच तीन विकेट राखून जिंकली. Rajasthan Royals beat Delhi Capitals by 3 wickets

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२१ची सातवी लीग मॅच झाली. या मॅचमध्ये टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने २० ओव्हरमध्ये आठ बाद १४८ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने १९.४ ओव्हरमध्ये ७ बाद १५० धावा करुन मॅच जिंकली.  

धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने रडतखडत सुरुवात केली. पण डेव्हिड मिलरच्या तुफानी खेळीने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६२ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. ख्रिस मॉरिसने नाबाद ३६, राहुल तेवतियाने १९, जयदेव उनाडकटने नाबाद ११, मनन व्होराने ९, संजू सॅमसनने ४, रियान पराग, जोस बटलर आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी २ धावा केल्या. दिल्लीकडून आवेश खानने ३, ख्रिस वोक्स आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून यष्टीरक्षक कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. त्याने जबाबदारीने खेळत ३२ चेंडूत ९ चौकारांच्या जोरावर ५१ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. टॉम करणने २१, ललित यादवने २०, ख्रिस वोक्सने नाबाद १५, शिखर धवनने ९, कगिसो रबाडाने नाबाद ९, अजिंक्य रहाणेने ८, रविचंद्रन अश्विनने ७ आणि पृथ्वी शॉने २ धावा केल्या. मार्कस स्टोइनिस शून्य धावा करुन बाद झाला. राजस्थानकडून जयदेव उनाडकटने ३, रहमानने २ आणि ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी