बेन स्टोक्सच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत संभ्रम

rajasthan royals chief coach is not sure about ben stokes availability बेन स्टोक्स आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे सांगणे कठीण असल्याचे राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक म्हणाले.

rajasthan royals chief coach is not sure about ben stokes availability
बेन स्टोक्सच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत संभ्रम 

थोडं पण कामाचं

  • बेन स्टोक्सच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत संभ्रम
  • बेन स्टोक्स सध्या कॅन्सरपीडीत वडिलांची काळजी घेण्यासाठी न्यूझीलंडमध्ये
  • मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दिली माहिती

दुबई: राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald, Rajasthan Royals Chief Coach) यांनी बेन स्टोक्स (Benjamin Andrew Stokes - Ben Stokes) आयपीएलमध्ये (Indian Premier League - IPL) खेळणार की नाही हे सांगणे कठीण असल्याचे सांगितले. मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडच्या (England) संघाचा हिरो ठरलेला बेन स्टोक्स सध्या कॅन्सरपीडीत वडिलांची काळजी घेण्यासाठी न्यूझीलंडमध्ये (New Zealand) आहे. बेनच्या वडिलांना ब्रेन कॅन्सर (Brain Cancer) झाला आहे. वडिलांच्या आजारपणाची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) दुसऱ्या कसोटीआधी बेन तातडीने न्यूझीलंडला रवाना झाला. अद्याप तो तिथेच आहे. (rajasthan royals chief coach is not sure about ben stokes availability)

बेन स्टोक्सच्या वडिलांच्या तब्येतीला लवकर आराम पडावा अशी आमची सदिच्छा आहे, असे अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले. 'सध्या बेन कठीण प्रसंगातून जात आहे. या परिस्थितीत आम्ही बेनवर खेळण्यासाठी दबाव टाकू इच्छित नाही.  त्याच्याकडून अद्याप काही संपर्क झालेला नाही. जोपर्यंत तो संघ व्यवस्थापनाशी बोलत नाही तोपर्यंत त्याच्या खेळण्याबाबत ठामपणे काही बोलणे कठीण आहे'; असे अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सांगितले. 

अँड्र्यू मॅकडोनाल्ड राजस्थान रॉयल्स प्रमाणेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचेही (Australia Cricekt Team) मुख्य प्रशिक्षक आहेत. आयपीएल सुरू होत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने त्यांना सवलत देऊन संयुक्त अरब आमिराती (United Arab Emirates - UAE) येथे जाण्याची परवानगी दिली. त्यांचे एकाचवेळी राजस्थान रॉयल्सचा सराव आणि ऑस्ट्रेलियाची इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली कामगिरी यावर लक्ष आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या वन डे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या  (बुधवार, १६ सप्टेंबर) खेळला जाईल. स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने आणि दुसरा इंग्लंडने जिंकल्यामुळे अखेरचा सामना निर्णायक आहे. टी-२० मालिकेत डोक्याला चेंडू जोरात लागल्यामुळे वन डे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) खेळू शकला नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात स्मिथ खेळेल, अशी आशा अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केली. उद्याचा सामना संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स), डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैद्राबाद), जोश हॅझलवूड (चेन्नई सुपरकिंग्स) हे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी इंग्लंडहून रवाना होतील. नियमाप्रमाणे क्वारंटाइनची मुदत पूर्ण करुन कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास हे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी पात्र ठरतील. जोपर्यंत हे खेळाडू कोविड प्रोटोकॉलप्रमाणे खेळण्यासाठी पात्र ठरत नाहीत तोपर्यंत त्यांच्या अनुपस्थितीत संबंधित संघ आयपीएलचे सामने खेळतील. या वास्तवाचे भान ठेवून राजस्थान रॉयल्स सुरुवातीच्या सामन्यांची तयारी करत असल्याचे अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले. 

अनुज रावत आणि यशस्वी जयस्वाल या दोघांकडून अपेक्षा आहेत. त्यांना सरावादरम्यान टिप्स दिल्याचे अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सांगितले. मॅच फिनिशर डेव्हिड मिलरच्या साथीला नव्या दमाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास संघ यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी