RR vs DC: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आज सामना, जाणून घ्या कोणकोणावर भारी

IPL 2021
Updated Apr 15, 2021 | 15:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

RR vs DC, Head to head record, ipl history: आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना रंगत आहे. जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड.

ipl 2020
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आज सामना 

थोडं पण कामाचं

  • राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना
  • ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यात जोरदार टक्कर
  • आयपीएल इतिहासाच्या आकडेवारीवरून जाणून घ्या कोणाचे पारडे जड

मुंबई: Rajasthan Royals vs Delhi Capitals, Head to Head Record, IPL: आज इंडियन प्रीमीयर लीग(IPL) 2021 चा सातवा सामना राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संजू सॅमसनला या वर्षी राजस्थान रॉयलचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. श्रेयस अय्यर दुखापग्रस्त झाल्याने आयपीएल २०२१साठी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२१च्या हंगामाची सुरूवात शानदार झाली. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सला सात विकेटनी मात दिली. या विजयासह दिल्लीचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना रंगतदार झाला. राजस्थान रॉयल्सला या पराभवानंतर दमदार पुनरागमनाचा विश्वास आहे. 

दरम्यान, दोन्ही संघ आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चिंतेत आहेत. राजस्थान रॉयल्सचा बेन स्टोक्स दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गलंदाज एनरिच नोर्जे कोविड १९मुळे क्वारंटाईन आहे. त्यासोबतच कॅगिसो रबाडाच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. 

हेड टू हेड रेकॉर्ड

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात २२ वेळा आमनेसामने आले होते. दोन्ही संघांनी ११-११ सामने जिंकले आहेत. म्हणजेच ५०-५० टक्के आहे. अशातच आज जो संघ जिंकेल तो आकड्यांनुसार पुढे निघून जाईल. 

टॉप परफॉर्मन्स

सक्रिय क्रिकेटर्सबाबत बोलायचे झाल्यास राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्यात ऋषभ पंत(२२५)सगळ्यात आधी आहे. श्रेयस अय्यर(१९३), शिखर धवन(१९२) आणि संजू सॅमसन(१६०) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास अमित मिश्राने २० राजस्थानी क्रिकेटर्सची शिकार केली आहे. यानंतर राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने ७ विकेट घेतल्यात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी