RR vs SRH: बटलरच्या शतकामुळे राजस्थानचा विजय, हैदराबादचा सहाव्यांदा पराभव

IPL 2021
भरत जाधव
Updated May 02, 2021 | 21:20 IST

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या २८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला ५५ धावांनी पराभूत केलं आहे.

Rajasthan vs Hyderabad:  rajasthan won by 55 runs
RR vs SRH: हैदराबादचा सहाव्यांदा पराभव   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला जोस बटलर
  • बटलरने ६४ चेंडूंमध्ये केल्या १२४ धावा
  • आयपीएलमधील बटलरने केलं पहिलं-वहिलं शतक आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या २८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला ५५ धावांनी पराभूत केलं आहे. या हंगामातील राजस्थानचा हा तिसरा विजय आहे. तर हैदराबादचा हा सहावा पराभव असून या सामन्यासाठी डेविड वॉर्नरऐवजी केन विलियमसनला संघाचा कर्णधार बनविण्यात आलं. पण विलियमसनही विजय मिळवू शकला नाही.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने २२० धावांच आव्हान हैदराबाद समोर ठेवलं. राजस्थानकडून फलंदाजी करणारा जोस बटलर यांने दमदार खेळी करत आपलं पहिलं वहिलं शतक ठोकलं. या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने हैदराबाद समोर धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ फक्त १७० धावा करू शकला. राजस्थानकडून गोलंदाजी करताना क्रिस मॉरिस आणि मुस्ताफिझुर रहमान यांनी  ३-३ गडी बाद केले.

हैदराबादची सुरुवात चांगली 

 

राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला  मनीष पांडे आणि जॉनी बेयरस्टो यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६. १ षटकात ५७ धावा केल्या. पांडेने २० चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार लगावत ३१ धावा केल्या. तर बेयरस्टोने २१ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. यात ४ चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. या दोघे बाद झाल्यानंतर हैदराबाद संघ विजयाच्या रुळावरुन खाली घसरला. त्यानंतर येणाऱ्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी झाली नाही. राजस्थान रॉयल्ससाटी क्रिस मॉरिस आणि मुस्ताफिझुर रहमानने चांगली गोलंदाजी केली. मॉरिसने आपल्या चार षटकात २९ धावा देत तीन गडी बाद केले. रहमानने चार षटकात २० धावा देत तीन गडी बाद केले. यानंतर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांनी एक- एक गडी बाद केले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी