मुंबई : आयपीएल 2022 च्या 34 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव केला. डीसीसमोर 223 धावांचे लक्ष्य होते, त्याला प्रत्युत्तरात संघ 207/8 धावाच करू शकला आणि सामना गमावला. कर्णधार ऋषभ पंतने 44 धावा केल्या. आरआरसाठी प्रसिद्ध कृष्णाने ४ बळी घेतले.(Rajasthan's 5th win in IPL 2022: Beating Delhi by 15 runs in a high scoring match.)
अधिक वाचा : Ryan Campbell: हॉस्पिटलमध्ये आयुष्याची लढाई लढतोय हा दिग्गज क्रिकेटर, परिस्थिती अद्याप गंभीर
राजस्थान रॉयल्सचा 7 सामन्यांमधला हा 5वा विजय होता, संघाने आतापर्यंत फक्त 2 सामने गमावले आहेत. त्याचवेळी दिल्लीची अवस्था बिकट दिसत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने 7 पैकी 4 सामने गमावले आहेत. डीसीने केवळ 3 सामने जिंकले आहेत.
अधिक वाचा : IPL 2022: परत ये माही...धमाकेदार धोनी स्टाईल विजयानंतर सेहवाग, जाफरने लिहिले असे काही...
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना आरआरने 2 गडी गमावून 222 धावा केल्या. जोस बटलरने सर्वाधिक 116 धावांची खेळी खेळली. या मोसमातील त्याचे हे तिसरे शतक ठरले. दिल्लीकडून खलील अहमद आणि मुस्तफिजुर रहमानने 1-1 विकेट घेतली.
अधिक वाचा : IPL: आताही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकते Mumbai Indians! रोहितच्या टीमकडे ही शेवटची संधी
आरआरसाठी, आर अश्विनने या सामन्यात 2 बळी घेतले आणि मागील सामन्यात हॅटट्रिक घेणारा युझवेंद्र चहलने 1 बळी घेतला. अश्विनने 4 षटकात 32 धावा दिल्या. त्याने पृथ्वी (27) आणि सर्फराज खान (1) यांना बाद केले. त्याचवेळी चहलने आपल्या स्पेलमध्ये 28 धावांत अक्षर पटेलची (1) विकेट घेतली.